
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तहसील कार्यालयात
शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की तहसील कार्यालय इमारती मध्ये तहसील कार्यालय,दुय्यम निबंधक ऑफिस, पंचायत समिती, कृषी विभाग, वन विभाग, शासकीय लेखा विभाग असे अनेक सरकारी कार्यालये आहेत त्यामुळे या इमारतीमध्ये रोज अनेक महिला, पुरुष,वयोवृद्ध तरुण यांची शासकीय काम करून घेण्यासाठी नेहमी वर्दळ असते अनेक कार्यालये दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर आहेत मात्र सद्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हातून आलेल्या नागरिकांना या नवीन इमारतीमध्ये प्रवेश केल्यावर थोडे हयासे वाटत असते मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर चढून गेल्यावर दम लागतो मात्र अशा वेळी घोट भर पाणी प्यावे असे वाटते मात्र चारही बाजूने फिरल्यावर या इमारती मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही असे लक्षात येते आणि त्या करिता खाली यायचे म्हटले तर एखाद्या अधिकाऱ्याला भेटायचे असेल तर तेवढ्या वेळात अधिकाऱ्यांची एखादी महत्वाची मिटिंग सुरू झालेली असते त्यामुळे नागरिकांना घोटभर पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो व दहावीस रुपयांची पाणी बाटली विकत घ्यावी लागते
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्ष्यात घेऊन नुकतेच समता बँकेने कोपरगाव बस स्थानकात प्रवाशांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून सोय उपलब्ध करून दिली त्याच पद्धतीने या शासकिय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी या पत्रकाद्वारे केली आहे.
