सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे दोन उसतोडणी कामगारांच्या वारसांना सहा लाख रूपये विमा धनादेश प्रदान:-विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे दोन उसतोडणी कामगारांचा अपघाती मृत्यु झाल्याने त्यांना कारखान्यांने उतरविलेल्या न्यु इंडिया इंशुरन्स कंपनी व गन्ना कामगार विमा पॉलीसी अंतर्गत प्रत्येकी तीन लाख रूपयांचे विमा धनादेश अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यांत आले. अध्यक्षस्थानी संचालक विश्वासराव महाले होते.
प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी उस उत्पादक सभासद, शेतकरी, कामगार, उसतोडणी कामगार आदींच्या व्यक्तीगत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येकाचा अपघाती विमा उतरविला आहे. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे म्हणाले की, अमृत व सुवर्ण संजीवनी शुगरकेन संस्थे अंतर्गत कार्यरत असलेले उसतोडणी गाडीवान गोरखनाथ जगन्नाथ हारदे (दत्तनगर वैजापुर) व जनाबाई मोतीलाल राठोड (सांगवी चाळीसगांव) यांचा अपघाती मृत्यु झाल्याने त्यांचे वारस श्रीमती आशाताई गोरख हारदे व मोतीलाल रामदास राठोड यांना प्रत्येकी तीन लाख रूपयांचे विमा धनादेश देण्यांत आले.
श्री. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, अपघातात अचानक दुर्दैवी संकट ओढवले तर विम्याचे महत्व समजते, त्यामुळे प्रत्येकाने विमा उतरविला पाहिजे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दुरदृष्टीकोन ठेवत सर्वप्रथम जनता अपघात विमा योजनेतुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्येक सभासद, शेतक-यासह कामगारांना विम्याचे कवच मिळवून दिले आहे.
अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेचे अध्यक्ष पराग संधान, सुवर्ण संजीवनीचे उपाध्यक्ष शिवनाथ शिंदे व त्यांचे सहका-यांनी मयत उसतोडणी कामगारांचे विमा प्रस्ताव संपुर्ण कागदपत्रासह न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीकडे वेळेत सादर केले, याकामी शाखाधिकारी श्रीमती. खंडेलवाल यांनी विशेष सहकार्य केले.
याप्रसंगी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, मानद कार्यकारी संचालक बापूसाहेब औताडे, व्यवस्थापक सोपानराव निकम, अनिल सोनवणे आदि उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार केशव होन यांनी मानले.

फोटोओळी:- कोपरगांव-
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या दोन उसतोडणी कामगारांचा अपघाती मृत्यु झाल्याने त्यांच्या वारसांना न्यु इंडिया इंशुरन्स कंपनी व गन्ना कामगार पॉलिस अंतर्गत प्रत्येकी तीन लाख रूपयांचे धनादेश अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते वितरीत करण्यांत आले. याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *