महाविद्यालयात येवुन माजी विध्यार्थीनीने जागवल्या स्मृती...
कोपरगांव प्रतिनिधी:-
‘अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना येथिल प्राद्यापकांनी जे शिकविले, जे रूजविले, किंबहुना अभ्यासक्रमा व्यतिरीक्त आधुनिक तंत्रज्ञान शिकवुन वेगवेगळे कौशल्ये माझ्यात बिंबविली गेली, आणि विश्वव्यापक स्पर्धा असताना देखिल आज अमेरिकेत जांगल्या पदावर, चांगल्या पगारावर आणि चांगल्या टेसला सारख्या कंपनीत नोकरी करू शकले, हे केवळ संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावरच आहे’, असे भावपुर्ण उद्गार संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २००६ च्या बॅचच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील माजी विध्यार्थिनी व सध्या अमेरीका स्थित टेसला कंपनीत असोसिएट मॅनेजर म्हणुन कार्यरत आलेल्या निलम कासवा यांनी काढले.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी जगाच्या पाठीवर कोठेही असले तरी आपल्या गावी आल्यानंतर किमान एक दिवस का होईना, महाविद्यालयात येवुन, आपापल्या विभागांना भेटी देवुन आपल्या प्राध्याकांप्रती आदर व्यक्त करीत स्मृती जागवतात. निलम कासवा या आपल्या गावी आल्यानंतर संजीवनी प्रती असलेल्या कृतज्ञतेच्या नात्याने त्यांना संजीवनी मध्ये आणलेच. माजी विध्यार्थी जेव्हा येतात, त्यांचा प्रवास कशा पध्दतीने यशस्वी झाला व होत आहे, या संदर्भात प्रत्येक विभागात ‘माय स्टारी बोर्ड’ या सदराखाली ते सध्या शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, तसेच उद्योग जग कसे आहे, भविष्यात कशाला महत्व असणार आहे, केवळ गुणपत्रिकेवरील गुण जीवनात यशस्वी होण्यासाठी पुरेसे नाहीतर व्यक्तिमत्व विकासासाठी अधिकचे कोणते मुल्ये व कौशल्ये आत्मसात केले पाहीजे, या सर्व बाबींचा उहापोह करतात. त्याचा फायदा सध्या शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना त्यांच्या ध्येय प्राप्तीकडे जाण्यासाठी होतो. अशाच कार्यक्रमात कासवा बोलत होत्या.
सदर प्रसंगी माजी गुणवंत विध्यार्थिनी म्हणुन त्यांचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला, तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. एम. व्ही. नागरहल्ली, समन्वयक डाॅ. डी. पी. भास्कर तसेच विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कासवा पुढे म्हणाल्या की मी पुणे, नाशिक व औरंगाबाद येथे वेगवेगळ्या कंपनीत इंजिनिअर म्हणुन काम केले. औरंगाबाद येथे एका कंपनीत कार्यरत असताना तेथे टेसला कंपनीचे एक शिष्टमंडळ आले होते. व त्यांना काही टेक्निकल बाबी सांगण्याची जबाबदारी माझ्यावर होती. तेथे शिष्टमंडळाने इंजिनिरीग ज्ञानाबरोबरच काॅम्प्युटर एडेड डीझाईन, ड्राईंग क्रीएटीव्हीटी, वेगवेगळ्या साॅफ्टवेअरचे असलेले ज्ञान, इत्यादी बाबींची प्रशंसा करून मला टेसला कंपनीत येण्याची ऑफर दिली. खरे तर मला मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात विध्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मेसा’ या मंचच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधिल सहभागातील अनुभवाचा प्रचंड फायदा झाला. विद्यार्थ्यांनी नवनवीन शिकत रहावे, स्वतःला कधीही कमी समजु नये, फक्त सकारात्मक विचाराने पुढे जात रहावे, मी यशस्वी होणारच, हा विचार अंगी बाळगावा. आणि आपण जींकत नाही, तो पर्यंत लढाई संपलेली नाही, असेच मानावे, एक दिवस आपण जींकलेलेच असु, असा सल्ला कासवा यांनी शेवटी दिला.
कासवा सुमारे दोन आडीच तास विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होत्या. या दरम्यान त्यांनी त्या संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजला तालुक्यातील कोळपेवाडी येथुन बसने प्रवास करायच्या असे सांगितले . कोळपेवाडी-संजीवनी ते अमेरिका त्यांचा जीवन प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी ठरला.

फोटो ओळीः- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २००६ च्या बॅचच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील माजी विध्यार्थिनी व सध्या अमेरीका स्थित टेसला कंपनीत असोसिएट मॅनेजर म्हणुन कार्यरत आलेल्या निलम कासवा संजीवनीच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.
