चांदगव्हाण सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब चांडे तर उपाध्यक्षपदी चंद्रभान शिंदे यांची निवड…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील चांदगव्हाण सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे बाळासाहेब रघुनाथ चांडे तर उपाध्यक्षपदी चंद्रभान धोंडीबा शिंदे यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले.


श्री. बाळासाहेब चांडे यांची अध्यक्षपदासाठी संचालक भागीनाथ चांडे यांनी सुचना मांडली तर त्यास संचालक मोहनराव शिंदे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी चंद्रभान शिंदे यांच्या नावाची सुचना संचालक रामदास चांडे यांनी मांडली तर त्यास संचालक राजेंद्र चांडे यांनी अनुमोदन दिले.


याप्रसंगी संचालक सर्वश्री सोमनाथ शिंदे, चंदाबाई शिंदे, लताबाई शिंदे, शोभा गुंडे, शिवाजीराव मोरे, अंबादास चांडे यांच्यासह चांद्व्हाण पंचक्रोशीतील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष बाळासाहेब चांडे म्हणाले की, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे सभासद शेतक-यांच्या प्रत्येक संकटात धावून येतात, जिल्हा बँकेअंतर्गत विविध योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी करू तर उपाध्यक्ष चंद्रभान शिंदे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे हे सातत्याने चांदगव्हाण पंचक्रोशीवासियांच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी तत्पर असतात. शेवटी सचिव संजय दिघे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *