विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजाला उदबोधक:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पृश्य अस्पृश्य भेद निवारण करण्यासाठी मोठे काम केले. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार संबोधले जाते त्यांनी अत्यंत कमी कालावधीत समाजाच्या भल्यासाठी कायदे तयार करून प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांचे विचार सर्व समाजाला उदबोधक आहे. युवकांनी घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे समग्र अध्ययन करून त्याचा दैनंदिन व्यवहारात वापर करावा असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमीत्त शहराचे वैभव असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळयाला अभिवादन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भते कश्यप होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व कोपरगांव आगाराहतही विवेक कोल्हे यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन केले.
याप्रसंगी भाजपाचे गटनेते रविंद्र पाठक, बाळासाहेब नरोडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, कोपरगांव आगार प्रमुख अभिजित चौधरी, रिपाईचे राज्य सचिव दिपक गायकवाड, तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर, गोपि गायकवाड, स्वप्नील निखाडे, दिनेश कांबळे विवेक सोनवणे वैभव गिरमे, अविनाश पाठक, सतिष रानोडे, सागर जाधव, फकिर महंमद पहिलवान, राजेंद्र पोळ, कैलास खैरे, खालीकभाई कुरेशी, नारायण अग्रवाल, सत्येन मुदंडा, सुशांत खैरे, देवराम पगारे, संजय पवार, शरद खरात, दिपक जपे, विनोद राक्षे, नानासाहेब रोकडे, डॉ गोवर्धन हुसळे, सागर कोपरे, नानासाहेब जगताप के पी रोकडे, शरद खरात आदि उपस्थित होते.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी थोर समाजसुधारकांच्या पुतळ्यासाठी विशेष योगदान दिलेले आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे दीन दलित सजामाच्या उध्दारासाठी सतत झटत असतात. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन शहर वैभवाच्या विकासासाठी कोटयावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून असंख्य कामे पुर्णत्वास नेली आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती नसुन विचार आहे, दीन दलित समाजाबरोबरच सर्व थरातील समाजाला त्यांनी पाठबळ देत शिक्षणाने माणूस ज्ञानी करण्याचा विडा उचलला होता. शेवटी रिपाई आठवले गटाचे सचिव दिपक गायकवाड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *