
कोपरगाव प्रतिनिधी:-
लहानमुलं मुळातच नटखट असतात… आपल्या खेळकर वृत्तीने सर्वांनाच भुरळ घालतात… त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रकटनारा नैसर्गिक भाव हा आंतरिक दडलेला असतो…पालक व सुजान नागरिक यांनी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला कि त्यांचे आयुष्य स्वच्छंदी अन् बहरलेल्या वृक्षासारखे होण्यास वेळ लागत नाही…आपण कोपरगावची बालकलाकार राशी अमोल शिंदे बालकलाकार विषयी बोलत आहोत…

राशी शिंदे ही १२ वर्षाची मुलगी कोपरगाव शहरातील टिळकगर भागात राहते…सेवानिकेतन काॅन्व्हेंट स्कूल मध्ये ७ वी इयत्तेत शिकते…राशीचे आजोबा सूर्यभान हे उत्तम हाॅलीबाॅल पटू आणि कोपरगाव नगरपरिषदेत नोकरीला होते… तर वडील अमोल हे एच.पी. गॅस एजन्सीत…आई अश्विनी गृहीनी आहे…राशीला सुर्यांश नावाचा मोठा भाऊ आहे…
राशीची आई अश्विनी यांना अभिनयाची लहानपणापासून आवड होती…आपले स्वप्न घेऊन राशी वाटचाल करेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते…चार वर्षांपूर्वी राशी ४ थीत असतांना तीचे आईने स्वतःच अभिनय करत टिक-टाॅक व्हिडिओ चित्रीकरण करत होती…टिक-टाॅक म्हणजे मोबाईल मधून ऐकू येणारा संवादावर आपण अनुकरण करत अभिनय करायचा असतो… आश्विनी यांना एका व्हिडीओ चित्रीकरण करतांना तसा अभिनय जमत नव्हता…अशा परिस्थितीत माय-लेकींचे संवाद सुरु असतांना राशीने स्वतः अभिनय करुन दाखवला…तो व्हिडिओ सोशल मीडियावर आला…त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली…

२४ जून २०२० ला तिची दखल “झी” २४ तास या मराठी वृत्तवाहीने घेतली… काही दिवसांत टिक-टाॅकवर बंदी आली…आपण मोठ्या संख्येने जमलेले चाहते राशीला विचारणा करु लागले…लोकप्रियतेचा आणि आपुलकीचा जिव्हाळा पाहून राशीला रडू कोसळले…पण काही दिवसांतच स्नॅक… इन्स्टाग्राम…या मधून राशी पुन्हा दिसत चाहत्यांच्या मोबाईल स्टेटसवर झळकू लागली…
राशींचे गुण तीच्या आई-वडीलांनी हेरले होते आणि वेगवेगळ्या संवाद…गाणी…यावर टिक-टाॅक व्हिडिओ चित्रीकरण करुन प्रसारित करण्याचा छंद जडला होता… चिमुकल्या राशीच्या छोट्या-छोट्या व्हिडिओला अबाल वृद्धांची पसंती मिळत गेली…तीच्या वेगवेगळ्या व्हिडिओला हजारोंनी स्वःताच्या मोबाईल स्टेटसला स्थान दिले…राशीचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत गेला… अहमदनगर जिल्हा… महाराष्ट्र आणि देशात अनेक ठिकाणी तिचे चाहते मोठ्या प्रमाणात आहे.आज तिचे मौज ॲप ११.७ मिलियन(एक कोटी दहा लक्ष सात हजार) तर यु-ट्युबवर ५ लक्ष चाहते आहेत… जवळपास तेवढेच इन्स्टाग्राम… फेसबुक असे धरुन चला… थोडक्यात सांगायचे तर आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील एकाही राजकीय पुढाऱ्यांना एवढे उस्फुर्त फाॅलोअर नाही…राशी आज या लोकप्रियतेच्या शिखरावर ही चिमुकली पोहोचत आहे…

राशीचे नावावरुन तीचे वडील अमोल शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले,”ती जेव्हा जन्माला आली तेव्हा माझ्या आयुष्यात स्थिरता आली… लक्ष्मीची पाऊले घेऊन आली आहे.असे सार्थ वाटते.”
राशीच्या अभिनयाचे अभिनेता अक्षयकुमार,रिवा अरोरा, जॅकलिन फर्नांडिस,क्रीती सॅनोन,अर्षद वारसी, सिद्धार्थ निगम,मोनी राॅय,अंजली अरोरा, मराठी स्टार सिध्दार्थ जाधव,टि-सिरीजच्या संचालिका तुलसी कुमार यांचे सह अनेक दिग्गज कलाकार यांनी कौतुक केले आहे… विशेष म्हणजे अक्षय कुमार यांचा बच्चन पांडे,हिरोपंती या चित्रपटाचे प्रमोशन मध्ये राशीला विशेष निमंत्रण दिले होते…राशीला “रायझिंग स्टार ऑफ व इयर ” या पुरस्काराचे सन्मानित करण्यात आले आहे… मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेत तीला बोलता येते आणि समजतात…त्याच बरोबर साऊथच्या गाण्यांवर प्रमोशन करते आहे… रणवीर सिंग यांनी बाॅलीवूडच्या इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झालेला राशीच्या अभिनयाचा एक व्हिडिओ स्वतः ट्विटरवर शेअर करुन कौतुक केले आहे…
ग्रॅज्युएट चहा ची ती ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आहे… महाराष्ट्र राज्यात अनेक ज्वेलरी शाॅप, नामांकित दुकानांचे उद्घाटन तीच्या प्रमुख उपस्थितीत होत असतात… मध्यंतरी गुजरात येथील सुरत शहरात तीच्या स्वागतासाठी विशेष गाडीवर स्वार करुन मिरवणूक काढली...तेव्हा हजारो सुरतचे नागरिक रस्त्यावर उतरून तीचे फोटो मोबाईल मध्ये घेत होते…सन २०२१ च्या मिस इंडियाचे कार्यक्रमात तीला विशेष निमंत्रण होते…अनेक हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात तिच्या अभिनयाबद्दल छापून आले आहे…यावरुन तिच्या लोकप्रियतेची उंची लक्षात येते...
सेवानिकेतन शाळेत शिकणाऱ्या राशीला शाळेविषयी कृतज्ञता भाव असून तीला सर्व शिक्षक आवडतात…तसेच या शाळेत तीचा मित्र-मैत्रिणींचा गोतावळा मोठा आहे…तसेच ती अभ्यासातही हुशार आहे…तीच्या करिअर बद्दल पालकांना विचारले असता…सध्या सुनिश्चित नसल्याचे सांगत पुढे १० वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ठरवू असे सांगितले… मात्र तीला सोशल मीडियावरील प्रभावशाली अभिनेत्री करण्याची इच्छा व्यक्त केली…
राशीचे एवढ्या लहान वयातील उपजत कला पाहून कौतुक वाटले…एरवी सोशल मीडियावर किरकोळ गोष्टींवर हार-तुरे घेऊन मिरवणारे पहात असतो…आपण “जिथं पिकतं तिथं विकत नाही…”या म्हणीला खरं ठरवू पहातो आहोत का…? बंगल्याची शोभा वाढवणार्या कुंडीतील गुलाबाचे सारेच कुतुहलाने कौतुक करतात…पण् रस्त्याच्या कडेला रानमाळावर वाढलेलं फुलही मनुष्याचे मन आनंदून देतात…एखाद्या प्रवासात असंख्य यातना झेलत रानमाळावरी फुलं हळुवार पणे जपुन पहा…आयुष्याचे सार्थक वाटू लागेल…
राशीचे :-
इन्स्टाग्राम – ashwinishinde_official(2.4M)
YouTube – ashwini shinde807(500 K)
राशी अमोल शिंदे -मो. 7499728883
https://www.instagram.com/reel/Cc7LCUIjjg7/?igshid=YmMyMTA2M2Y=
बालकलाकार राशीचे आणि पालकांचे मनापासून कौतुक वाटलं… शुभेच्छा आहेतच…
- सुशांत घोडके
सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत
स्वच्छता-जलशक्ती-वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान
सदस्य- गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ
