डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैज्ञानिक विचारांची आज देशाला गरज:- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर : – ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ असा संदेश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण विश्वाला सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्यांचे बहुमोल विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या वैज्ञानिक विचारांची आज देशाला गरज आहे असे प्रतिपादन श्री साईंबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ना.आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपल्या देशाला पुढे घेवून जाण्यासाठी देशाची एकता, अखंडता टिकून राहणे अत्यंत गरजेचे आहे. समाजविघातक विचारांना बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीसाठी समाजाचा एकोपा अत्यंत महत्वाचा असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारातून दाखवून दिले आहे.त्याचबरोबर भारतात मोठे धरण बांधण्याचे तंत्रज्ञान तसेच बहुउद्देशीय प्रकल्प निर्माण करण्याच्या कामात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताच्या विकासाचे जनक म्हणून संबोधले जाते. देशाला प्रगतीचे यशोशिखर गाठण्यासाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैज्ञानिक विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, भन्ते आनंद सुमनजी, माजी नगरसेवक संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, फकीर कुरेशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सचिव सौ. रेखा जगताप, सुनील मोकळ, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, विजय त्रिभुवन, संजय कांबळे, साहेबराव कोपरे, डॉ. गोवर्धन हुसळे, साहेबराव रणशूर, संजय दुशिंग, राजेंद्र खैरनार, मनोज शिंदे, किरण बागुल, संतोष शेजवळ, के.पी. रोकडे, युवराज दुशिंग, देवेंद्र बनकर, मनोज शिंदे, मीरा साळवे, भाग्यश्री बोरुडे, दिक्षा उनवणे, उषा उदावंत, शितल वायखिंडे आदींसह समाजबांधवव भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना ना. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *