

कोपरगाव प्रतिनिधी:-
वैजापुर तालुक्यातील म्हस्की गाव येथील जागृत देवस्थान हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.म्हस्की गाव येथील हनुमान मंदिर अंत्यत जागृत असुन अनेक भाविक भक्तांच्या मनोकामना येथे पूर्ण झाल्या आहे.या देवस्थान ट्रस्टचे संस्थापक मनोहर सुर्यभान सोमवंशी म्हणाले की , कोरोना च्या काळात मंदिरे बंद होती त्यामुळे कोणतेही उत्सव साजरे करता आले नाही यावेळी सरकारने निर्बंध उठविल्या मुळे आम्ही ह्यावर्षी मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करणार आहोत.
तसेच देवस्थान ट्रस्टचे सदस्य हरि चंद्रभान सोमवंशी यांनी माहिती देतांना म्हणाले की, हे मंदिर अंदाजे २०० वर्षा पुर्वीचे आहे. भाविकांच्या सहकार्याने आज भव्य दिव्य असे मंदिर उभे राहिले आहे. हनुमान जयंती यावर्षी साजरी करण्यात येत असुन धार्मिक कार्यक्रम पुजापाठ यावेळी होणार आहे. पंचक्रोशीतील भाविकभक्त यावेळी दर्शनासाठी येत असतात.

या देवस्थानचे कमिटीच्या वतिने मनोहर सोमवंशी, सुभाष सावंत, संजय तागड, शरद सोमवंशी , नानासाहेब तागड, भगवान सोमवंशी, हरिचंद्र सोमवंशी, प्रमोद सोमवंशी, बाबासाहेब सोमवंशी, विजय सोमवंशी, अनिल घोलप, शिवाजी साबळे, नानासाहेब सोमवंशी, कोंडीराम सोमवंशी, हरीभाऊ सोमवंशी, राजेंद्र सोमवंशी, काशिनाथ सोमवंशी, श्रीमती वनिता विजय सोमवंशी,
भगवान सोमवंशी, बाळासाहेब खिल्लारी, यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.व येणार्या हनुमान जयंती निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…

