अभिमान आमच्या ताईचा स्वाभिमान सकल नाभिक समाजाचा नांदेडच्या आरती गायकवाड न्यायाधीश पदी नियुक्त होणार:- पत्रकार संजय पंडित…

Uncategorized

||अभिनंदन||
कोपरगाव प्रतिनिधी:-
लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेत नांदेडच्या आरती मारोतराव गायकवाड या नाभिक समाजातील कन्येने घवघवीत यश मिळवून न्यायाधीश पदी विराजमान होण्याचा बहुमान मिळवला आहे.
राज्यातून तिला ४२ वा रँक मिळाला असून नाभिक समाजातून न्यायाधीशपदी नियुत होणाऱ्या त्या पहिला महिला आहेत.
सर्व साधारण नाभिक कुटुंबात जन्मलेल्या आरती गायकवाड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शारदा विद्यामंदिर येथे झाले असून त्या निवृत्त पोलीस अधीक्षक मारोतराव गायकवाड यांच्या कन्या आहेत.तसेच पुण्यातील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते पोपटराव कदम हे त्यांचे मामा आहेत.
शासनाची कोणत्याही प्रकारे सवलत अथवा सहाय्य मिळत नसताना नाभिक समाजातील मुले स्वबळावर एकेक यशाचे शिखर गाठत आहे याचा सकल नाभिक समाजास सार्थ अभिमान आहे.आज राज्यभरातून आरतीच्या या दैदिप्यमान यशाचे कोतुक केले जात असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आरती गायकवाड यांच्या या नेत्रदीपक यशाने समाजाच्या शिरपेचात आणखी एक बहुमानाचा तुरा रोवला जाऊन समाजाची मान अभिमानाने उंचावली आहे असे गौरवोद्गार राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महावीर गाडेकर यांनी अभिनंदन करताना सांगितले.
इतर प्रस्थापित समाजातील मुलीप्रमाने नाभिक समाजातील मुलींनी देखील मागे न राहता सर्व सरकारी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन आपली विद्वत्ता सिद्ध करावी आणि यशाचे एकेक शिखर गाठण्याचे आवाहन राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष आणि पत्रकार संजय पंडित यांनी यावेळी केले.
आरती ताई यांचे हे महान यश समाजातील मुलींना नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे उदगार पक्षाचे सचिव रमेश राऊत यांनी गौरव करताना अभिमानाने काढले.
यावेळी ज्येष्ठ सल्लागार शेखर काका भोर,तुकाराम सोनवणे,अरुण कालेकर,डॉ.अरविंद झेंडे,पुणे जिल्हा अध्यक्ष भगवानराव शिंदे,संपर्क प्रमुख गोपीनाथ राव बिडवे,गजानन राऊत इत्यादी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी यावेळी अभिनंदन केले.
राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या महिला अध्यक्षा अलकाताई सोनवणे,महिला संपर्क प्रमुख वानिताताई भालेकर,बेबीताई कऱ्हेकर,सुरेखाताई साळुंके, अशामतीताई मोतेकर,कान्होपात्रा पंडित आदी महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी आरती गायकवाड यांचे मनःपूर्वक कौतुक करून अभिनंदन करताना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *