कोपरगांवच्या क्रिकेटपटूंचे नांव देशात झळकावे:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट खेळातून आपल्या देशाला जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात नांवलौकीक मिळवून दिला असून तरूणाईमध्ये हा खेळ आता अधिक लोकप्रिय होत आहे तेंव्हा या खेळातुन कोपरगांवच्या क्रिकेटपटूंचे नांव देशात झळकावे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
कोपरगांव शहरातील कर्मवीर भाउराव पाटील विद्यालयाच्या मैदानावर टिळकचौक क्रिकेट क्लब आयोजित विवेक कोल्हे क्रिकेट चषक दुस-या पर्वाचा शुभारंभ बुधवारी विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, खेळ हा तंदुरूस्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्यायामातुन तरुणांनी शरीरसंपदा कमवावी. शेजारी श्रीरामपुरच्या झहीर खानने भारताला विश्वचषक मिळवून देण्यांत जी कामगिरी केली त्यापेक्षाही सरस कामगिरी येथील खेळाडूंनी करून दाखवत आपला नांवलौकीक उंचवावा. ग्रामिण भागातील खेळाडुंना क्रिकेट बरोबरच अन्य क्रीडा प्रकारातील सर्व मार्गदर्शनांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे सातत्याने सहकार्य व पाठबळ देत असतात. संजीवनी युवा प्रतिष्ठानने देखील कोरोना आपत्तीनंतर क्रीडा क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत करून विविध स्पर्धेतुन तरूणाईला व नवोदित क्रीडापटूंना उभे करण्यासाठी स्वतंत्र मोहिम आखली आहे. टिळक चौक क्रिकेट क्लब व त्यांचे सर्व सहकारी यात हिरीरींने भाग घेवुन या क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यांसाठी पुढाकार घेत आहे त्या सर्वांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे असे सांगुन त्यांनी क्रिकेट चषक स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व संघातील खेळाडूंची ओळख करून घेत त्यांची क्रीडा प्रकारातील रूची जाणून घेतली.
याप्रसंगी श्री.अशोकराव लकारे,श्री.पराग संधान,श्री.विजय आढाव,श्री.राजेंद्र सोनवणे,श्री.विजय वाजे,श्री.सत्यन मुंदडा,श्री.स्वप्निल निखाडे,श्री.कालुआप्पा आव्हाड,श्री.रवींद्र रोहमारे,श्री.अविनाश पाठक,श्री.वैभव गिरमे,श्री.विवेक सोनवणे,श्री.बापु पवार,श्री.गोपीनाथ गायकवाड,श्री.सुशांत खैरे,श्री.किरण सुपेकर,श्री.दादासाहेब नाईकवाडे,श्री.सागर बढे,श्री.सागर जाधव,श्री.लक्ष्मन मंजुळ,श्री.राजेंद्र गंगुले,श्री.सोमनाथ गंगुले,श्री.रवींद्र चौधरी,श्री.रवींद्र लचुरे,श्री.देवराम पगारे,श्री.खालिकभाई कुरेशी,श्री.शंकर बिऱ्हाडे,श्री.अमोल म्हस्के,श्री.रोहन दरपेल,श्री.रवींद्र देवडे,वासुदेव शिंदे,श्री.बाळाभाऊ लकारे,श्री.राजेंद्र मेहरे,श्री.सिध्दु भाटीया,श्री.सचिन जाधव,श्री.इलियासभाई शेख,श्री.दिपक जपे,श्री.बाळासाहेब आढाव,श्री.दिनेश कांबळे,श्री.मनिश जाधव,श्री.अनिल जाधव,श्री.नरेंद्र लकारे,श्री.दादाभाऊ गंगुले,श्री.ईश्वरभाऊ पंडोरे,श्री.सौरभ होते,श्री.शक्तीजी परदेशी,श्री.संजय खरोटे आदींसह खेळाडू प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *