कोरोनासारख्या अवघड परिस्थीतीतही ज्योती पतसंस्थेचा दैदीप्यमान असा कारभार:- चेअरमन रविकाका बोरावके…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात उत्तम अशी आर्थिक कामगिरी करून , महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेचा लौकीक ज्योती पतसंस्थेने कायम राखला आहे . गेल्या दोन आर्थिक वर्षात कोरोना सारख्या महामारीने बाजारपेठेत मंदीचे वातावरण होते . अनेक महिने व्यवहार व बाजारपेठ बंद होत्या . त्यामुळे कर्ज वितरण व वसुली ठप्प झाल्यामुळे अनेक आर्थिक संस्था अडचणीत आल्या होत्या . परंतु आपल्या उज्वल परंपरेप्रमाणे ज्योतीचा नावलौकीक कायम ठेवून उत्तम अशी कामगिरी संस्थेने केलेली आहे . असे संस्थेचे चेअरमन अॅड .. श्री . रविकाका बोरावके यांनी सांगितले . मार्च अखेर ठेवी २४३ कोटी इतक्या असून कर्ज वाटप १५५ कोटी झालेले आहे . कर्ज वाटपाचा सी.डी रेशो ६४ % असून , गुंतवणूक १०३ कोटी इतकी आहे . अशा अडचणीच्या काळातही वसुली प्रकीया चांगली असून निव्वळ एन.पी.ए चे प्रमाण ० % इतके आहे . सर्व कर्ज तारणी असल्याने वसुली हमखास होत असते . चांगले ठेवीदार बरोबरच चांगली कर्जदार हि संस्थेची जमेची बाजू आहे . ३१ मार्च अखेर २ कोटी ५८ लाख इतका नफा संस्थेस झाला असून संस्थेच्या १ ९ ८८ च्या स्थापनेपासून सातत्याने ऑडीट वर्ग अ मिळत आलेला आहे . अशी माहीती संस्थेचे सरव्यवस्थापक श्री . दिलीपराव रांधवणे यांनी दिली . . तंत्रज्ञानातील काळानुरूप होत गेलेले बदल व नवीन सुधारणा वेळोवेळी अंगिकारल्या आहेत . कॅशलेस व्यवहाराबाबत केवळ गवगवा न करता प्रत्यक्ष कामकाज सुरू आहे . स्वतःचे ए.टी.एम. कार्ड क्युआर कोड प्रणाली , मोबाईल बँकींग , मनी ट्रान्सफर , आर . टी.जी एस व आय.एम.पी. एस या सुविधा , एस . एम एस सव्र्हींस इत्यादी सर्व आधुनिक संकल्पना संस्थेत यशस्वीपणे चालु आहेत . मर्यादित शाखांव्दारे उत्कृष्ट आर्थिक व्यवहार , काटकसरी कारभार , डामडौल व नाटकी कारभार न करता पारदर्शीपणामुळे महाराष्ट्रातील एक चांगली संस्था असा गौरवोदगार खातेदाराच करत असतात . त्यामुळे खोटया प्रसिध्दीपेक्षा जनतेने केलेले कौतुकामुळे दुस – या सर्टीफिकेटची आवश्यकता नाही असे अभिमानाने नमुद करावेसे वाटते . असे संस्थेचे अध्यक्ष अॅड . श्री . रविकाका बोरावके यांनी सांगितले . दरवर्षी ३१ मार्च रोजी आर्थिक पत्रके प्रसिध्द होतातच पण पुढील आर्थिक पुढील वर्षात काय नवीन संकल्पना राबवावयाच्या असे धोरण ठरवूनच नवीन वर्षाचा कारभार सुरू केला जातो . असे संस्थेचे उपाध्यक्ष श्री.देवराम सजन यांनी नमुद केले . सन २०२१- २२ या आर्थिक वर्षाचे पत्रके जाहीर करताना पत्रकारांच्या बैठकीत सर्व संचालक श्री प्रभाकर पाटील , श्री.मच्छिंद्र पठाडे , श्री . वाल्मिक भास्कर , इंजि . श्री . चंद्रशेखर भोंगळे , श्री कारभारी जुंधारे , श्री . महेंद्र नवले , श्री . यशवंत आबनावे श्री राजेंद्र बोरावके श्री श्याम बोरावके इत्यादी संचालक हजर होते . शेवटी संस्थेचे चेअरमन अॅड . श्री रविकाका बोरावके यांनी सर्व संचालक , सर्व सभासद कर्मचारी , प्रतिनिधी , खातेदार व ठेवीदार , तसेच पत्रकार यांचे आभार मानले व पुढील काळातही असेच सहकार्य मिळत राहो ही अपेक्षा व्यक्त केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *