
कोपरगाव प्रतिनिधी:-
मा. सर्वोच्च न्यायालयाने महिला व बाल विकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध करून दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यासाठी एक कोटी पंधरा लक्ष रुपये बाल न्याय निधी प्राप्त झाला असून
कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रति बालक १० हजार रुपये प्रमाणे तो निधी खर्च केला जाणार आहे.
कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांच्या नातेवाईकांनी एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रति बालक १० हजार रुपयांचा निधी प्राप्त करणेसाठी तात्काळ आपल्या जवळच्या शाळा, विद्यालय किंवा महाविद्यालयात ज्या ठिकाणी ही मुले शिकत असतील त्या ठिकाणी जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेले फॉर्म भरून द्यावा किंवा तालुक्याच्या ठिकाणी तालुका बाल विकास अधिकारी, तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी यांचेशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब ढुस व सचिव प्रशांत कराळे यांनी केले आहे.
