उष्मघातापासून जीवसृष्टीचे जतन व संवर्धन करुया, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे आवाहन…

Uncategorized

कोपरगांव/शिर्डी प्रतिनिधी:-
सूर्याचे उष्णतेमुळे पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान हे निसर्गाचे असमतोलाचे द्योतक असून या उष्माघातामुळे मनुष्य, वन्यजीव,पक्षी,जलजीव,झाडे-वेली यांना हानी पोहचत आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जीव महत्वाचा असून प्रशासनाबरोबर प्रत्येकाने उष्मघातापासून जीवसृष्टीचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात पुढील काही दिवसांत तापमान वाढीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे…या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी •दररोज पुरेसे पाणी प्यावे.• प्रवासात पाणी सोबत ठेवा.• हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरावे.• उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरावे.• उन्हात जाताना उपलणे/ टोपी / हॅट खाली ओलसर कपड़ा ठेवा.पशू,पक्षी यांना पिण्याच्या पाण्याचे भांडे ठेवावे.
नागरिकांनी • शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.• कष्टाची कामे उन्हात करु नये.• पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका. • गडद रंगाचे तंग कपडे वापरु नका.• उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा,स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.• पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा. • ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.• मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळावे.• खूप प्रधिनयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नये. अशा पध्दतीने उष्माघातापासून प्राथमिक काळजी घ्यावी…
तज्ञांकडून उष्णते संदर्भात खालील प्रमाणे लक्षणे आढळल्यास प्राथमिक स्वरूपात काय करावे याबाबत आवाहन केले आहे…
★ उष्णता विकार – सनबर्ग
लक्षणे – कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप आणि डोकेदुखी
प्रथमोपचार – साधा साबण वापरून आंघोळ करावी. घामास अडथळा करणारा कातडीवरील तेलकटपणा दूर करावा. कातडीवर फोड असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
★ उष्णता विकार – उष्णतेमुळे स्नायूंमध्ये गोळा येणे(हीट क्रॅम्पस)
लक्षणे – हातापायात गोळे, पोटाच्या स्नायुत मूरडा,खूप घाम
प्रथमोपचार – रुग्णाला सावलीत आणि थंड जागी हलवा. दुखऱ्या स्नायूला हलका मसाज द्या. थोडे पाणी प्यायला द्या. उलटी झाली तर पाणी देऊ नका…
★ उष्णता विकार – उष्णतेमुळे प्रचंड थकवा (हिट एक्झॉस्टेशन)
लक्षणे – खूप घाम, थकवा, कातडी थंडगार, नाडीचे ठोके मंद, डोकेदुखी, चक्कर,उलटी
प्रथमोपचार – रुग्णाला थंड जागी शक्यतो ए.सी. मध्ये झोपवा. अंगावरील कपडे सैल करा, ओल्या थंड फडक्याने अंग पुसुन घ्या. थोडे थोडे पाणी पाजत रहात. उलटी होत असेल तर पाणी देऊ नका. दवाखान्यात हलवा.
★ उष्णता विकार – उष्माघात (हिट स्ट्रोक)
लक्षणे – ताप (१०६ डिग्री फॅ), कातडी- गरम आणि कोरडी, नाडीचे ठोके – वेगात आणि जोरात, घाम नाही. अर्धवट शुद्धीत
प्रथमोपचार – या रुग्णाला तात्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. थंड पाणी/ ए.सी.मध्ये न्या. कपडे काढा. थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पॉन्जिंग, तोंडाने पाणी देऊ नका…
• सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणी, बँका, पेट्रोल पंप, मुख्य रस्ते इ. उन्हात लोकांना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण करणे.
• बागा, धार्मिक ठिकाणे, धर्मशाळा दिवसभर लोकांसाठी खुल्या ठेवणे. टेरेसला उष्मा विरोधी रंग लावणे.
• कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांचे कामाच्या वेळा बदलणे. उष्णतेपासून संरक्षण कसे करावे याबाबत लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.
स्वच्छता-जलशक्ती-वृक्षारोपण आणि पर्यावरणाचे प्रणेते सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि संवर्धन सुरू आहे.तसेच जलशक्ती अभिनायाच्या “कॅच व रेन” च्या माध्यमातून जनजागृती सुरु आहे.
ज्या पद्धतीने पर्यावरणाचा विनाश करत चाललो आहोत, त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे. नागरिकांनी सतर्क राहून उष्मघातापासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्याला स्वतःची काळजीही घ्यायला हवी आणि आपल्या पूर्ण जीवसृष्टीचे संरक्षण व्हावे, याकरिताही प्रयत्न करावे लागतील. असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *