
कोपरगाव प्रतिनिधी:-
मित्रांनो नमस्कार.. ओम साई
शिर्डी शहरातील स्वच्छतेचे जनक म्हणून देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली अशा ग्रिन एन क्लिन शिर्डी यांच्या संकल्पनेतून श्री साईबाबा संस्थान आणी शिर्डी ग्रामस्थांच्या पूढाकाराने दि.१३ मार्च २०२२ रोजी ऐतिहासिक शिर्डी परिक्रमा पार पडत असतांना मिरवणुकीत मुख्य आकर्षण असलेल्या रतलाम येथील साईभक्त अनिल सिसोदिया यांच्या पथकाकडून साईबाबांच्या फोटोसाठी हार बनविण्याचे विसरले होते. हि गोष्ट अनिलभाई यांच्या अगदी मिरवणूक निघणार त्यावेळी लक्षात आली.

भव्य दिव्य ऐतिहासिक परिक्रमेत रथातील फोटोला हार नाही
अनिलभाई यांना काय करावे सुचेनासे झाले.पाच ते दहा मिनिटे अनिलभाई चिंतेत पडले होते. ती वेळ साधारणपणे पहाटे पावणेसहा वाजेची होती.हार आणण्यासाठी कोणाला सांगावे असा डोक्यात विचार सुरू होता.कोणाला तरी सांगावे म्हणून रथाजवळून दहा मिनिटे बाजूला झाले.थोड्या वेळाने पून्हा रथाजवळ येऊन बघतो तर काय कोणीतरी साईबाबांच्या फोटोला सुंदर असा दिव्य हार घातलेला नजरेस पडला.त्यानंतर चमत्कार बघा साईबाबांनी ऐनवेळी कोणा एका भक्तामार्फत हार घालून घेतला आणी परिक्रमेचे आयोजक आणी साईभक्त अनिलभाई सिसोदिया यांची लाज राखली.हा एक प्रसंग सांगातांना अनिलभाई यांचे डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहात होत्या.परंतु हा हार आला कुठून ? कोणी घातला ? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

हाराचा शोध घेत असतांना हार घालणारा भक्त मिळून आला. तो असा कि, हाराच्या चमत्काराची पोस्ट फेसबुकवर टाकण्यात आली होती. सदरची पोस्ट बाबांच्या श्रद्धेपोटी निस्सीम साईभक्तांनी सोशल मीडियावर व्हायरल केली.ती पोस्ट दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात जाऊन पोहचल्यावर ज्या भक्ताने बाबांच्या फोटोला हार घातला होता, त्या बेळगाव येथील भक्ताने ती वाचली.पोस्ट वाचल्यावर त्यालाही आपल्या हारांबाबत बाबांचा झालेला चमत्कार सांगण्यासाठी हुरहुर लागली होती.त्यामुळे त्या भक्तांने शिर्डी परिक्रमेचे आयोजक शिर्डीतील ग्रिन एन क्लिनचे अध्यक्ष अजितभाऊ पारख यांच्याशी दूरध्वनीवरून कसाबसा संपर्क साधला आणी हाराबाबत माहिती देत आणी आणखी एक वेगळा चमत्कार सांगीतला.या चमत्काराचा प्रसंग सांगत असतांना श्रोता आणी वक्ता या दोघांच्याही अंगावर अक्षरशः शहारे आले होते. त्या हाराबाबतची कहाणी अशी आहे की…
बेळगाव येथील साईभक्त यांची इच्छा होती की
शिर्डीत साईसमाधी मंदीरातील श्री साईबाबांच्या मुर्तीला आपला हार घालण्यात यावा म्हणून त्या भक्ताने परिक्रमेच्या आदल्या दिवशी बेळगाव येथून खास पध्दतीने बनवलेले चार आकर्षक हार शिर्डीत आणले होते. त्यापैकी एक हार समाधी मंदीरातील मुर्तीसाठी,एक हार द्वारकामाईसाठी एक हार चावडी आणी एक हार श्री खंडोबा मंदिरासाठी असे त्याने नियोजन केले होते. परंतु घडले असे कि भल्या पहाटे परिक्रमेच्या मुख्य दिवशी त्या भक्ताने एक हार द्वारकामाईत आणी एक हार चावडीत देऊन साधारणपणे पावणेसहा वाजेच्या सुमारास श्री खंडोबा मंदीरात येऊन खंडोबा महाराजांच्या मुर्तीस तिसरा हार अर्पण केला.श्री खंडोबा मंदीरातून बाहेर पडल्यानंतर राहिलेला एक हार समाधी मंदीरात द्यायचा होता परंतु मनात चिंता भेडसावत होती कि आपला हार समाधीवरील मुर्तीसाठी घेतील कि नाही असा मनोमन विचार करत असतांना अचानक त्या भक्ताचे लक्ष खंडोबा मंदीरासमोर उभ्या असलेल्या रथातील बाबांच्या फोटोकडे वेधले आणी त्याने आपल्या हातातील चौथा हार क्षणाचा विलंब न करता रथामधील फोटोस अर्पण केला.त्याला या गोष्टीचा खूप आनंद झाला कि ऐतिहासिक अशा शिर्डी परिक्रमेतील श्री साईबाबांच्या रथात विराजमान झालेल्या बाबांच्या फोटोला आपला हार घातला गेला.

सांगायचे तात्पर्य हेच कि,बाबांनी एका भक्तांकडून त्याच्या मनातील इच्छा पूर्ण केली तर दुसऱ्या भक्ताची लाज राखली. समाधी मंदिरात बाबांच्या मुर्तीसाठी आणलेला हार रथात विराजमान झालेल्या बाबांनी आपल्या भोळ्या भक्तांकडून घालून घेतला हा चमत्कार नाही तर काय आहे….
जय_साईनाथ !!
