माजीमंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या जाण्याने सर्वसमावेशक नेतृत्व लोप पावले:-संपतराव भारुड…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघर्ष करा, संघटित व्हा या संदेशाचे तंतोतंत पालन माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी दलित-आंबेडकरी चळवळीमध्ये रुजविण्याचे काम केले, त्यांच्या जाण्याने सर्वसमावेशक नेतृत्व लोप पावले अशा शब्दात अहमदनगर जिल्हा पिपल्स रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जमनराव भारुड यांनी श्रद्धांजली वाहिली.
ते पुढे म्हणाले की, संवत्सर जिल्हा परिषद गटातून माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी आपल्या सारख्या राजकारणातील काडीचा अनुभव नसणाऱ्या, आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या मागासवर्गीय उमेदवाराला थेट जिल्ह्याच्या सभागृहात प्रश्न मांडण्याची संधी दिली हा आम्हा सर्व मागासवर्गीय समाजाचा मोठेपणा आहे.
सर्वांना बरोबर घेऊन, मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी झटणारे व्यक्तीमत्व म्हणजे शंकरराव कोल्हे होय. त्यांच्या १९७२ च्या पहिल्या निवडणुकीत सिंह खुण घेऊन त्यांनी आपली ओळख कोपरगाव विधानसभेला करून दिली आणि शेवटपर्यंत ते राजकारणातील सिंह म्हणूनच वावरले. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले तद्वत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी अभियांत्रीकी तांत्रिक शिक्षणाची गंगोत्री शेतकऱ्याच्या मुलांच्या दारात आणुन पोहोचवली अशा शिक्षण महर्षी कर्मवीराने गोदावरी काठी चिरनिद्रा घेतली. त्यांची पुढची पिढी समाजकारणiत प्रगल्भ असून सत्तेचे विकेंद्रीकरण करून संजीवनी उद्योग समूह अंतर्गत असलेल्या सर्व संस्थावर त्यांनी मागासवर्गीय समाजाला दिलेले प्रतिनिधीत्व एक उल्लेखनीय बाब आहे, असा दलीतांचा, दीनदुबळ्यांचा कैवारी पुन्हा होणे नाही असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *