साईआश्रया परिवारातील गुणवंत मुलगा अविनाश फुल्लारे याची गगन भरारी:- साईसेवक गणेश दळवी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री साईबाबांच्या कृपाआशीर्वादाने सुरु असलेल्या साईआश्रया परिवारातील गुणवंत मुलगा अविनाश फुल्लारे हा वैजापूर शिरसगाव येथून 10 वर्षापूर्वी साईआश्रयात दाखल झाला होता..आईची खूप गरिबी,राहायला घर नाही,काही काम धंदा नाही मिळेल ते हातावरचे काम करत,कधी धुनी भांडी तर कधी फुटपाथवर पेरू डाळींब विकून कसेबसे दिवस काढत होती..मुलाचे संगोपन करणे अशक्य झाल्याने मुलाला साईआश्रय परिवारात देण्याचा निर्णय घेतला.आईचे दुःख पहिल्यामुळे अविनाशने अभ्यास करण्याची चिकाटी सोडली नाही..


लॉकडाऊन मध्ये कॉलेज बंद असून देखील त्याने 12 वी ला 89 % मार्क मिळविले पुढे त्याने CET ची परीक्षा दिली,त्यात गुण चांगले असल्यामुळे त्याचा नंबर पुणे येथील नामवंत शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज येथे BBALLB साठी प्रवेश मिळाला ही आपल्या शिर्डीकरांसाठी व साईआश्रयासाठी खूप अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे तेव्हा आज श्री साईबाबांचे दर्शन घेऊन समता चॅरिटेबल ट्रस्ट चे मा. काकासाहेब कोयटे , मा. बाळकृष्ण सुरासे महाराज , मा. कमलाकर साहेब कोते पा. , शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील , मा. निलेश दादा कोते पा., मा . राहुलभाउ गोंदकर पा व सचिन भाऊ तांबे पा यांनी पुढील भावी वाटचालीस शुभ आशीर्वाद त्याला पुणे येथे कॉलेजला पोहचविले आहे.. तेव्हा नक्कीच तो पदवी घेऊन आपले स्वप्न पूर्ण करून पुन्हा शिर्डीत येईल तेव्हा खरेच साईआश्रयातील मुलांची अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करत आहे
ओम साई राम
साई सेवक – गणेश दळवी
मो – 9637549300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *