महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरण २०२० अंतर्गत ६०% वीज बिल माफीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा:- आप्पासाहेब ढुस…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरण २०२० अंतर्गत थकीत वीज बिल एकरकमी भरणारांना एकून वीज बिलाच्या ६०% वीज बिल माफ करण्याची शासनाची योजना आहे.. या योजनेचा आज प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघा चे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी लाभ घेतला. व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा येथील महावितरण च्या कार्यालयात आज समक्ष हजर राहून या योजनेतील समायोजित होऊन देय असलेले स्वतःचे वीज बिल रक्कल रुपये ३४,२७०/- ढुस यांनी महावितरण कार्यालयात रोख भरणा केला. त्यामुळे शासन नियमानुसार आप्पासाहेब ढुस यांना एकून थकीत वीजबिल रकमेच्या ६०% वीज बिल माफीची सवलत मिळाली.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरण २०२० चा लाभ घेतल्या बद्दल महावितरणचे देवळाली प्रवरा येथील उप कार्यकारी अभियंता देहरकर साहेब यांनी आप्पासाहेब ढुस यांचे विशेष आभार व्यक्त करून अभिनंदन केले. दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत कृषी धोरण २०२० योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना लाभ मिळणेसाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या महावितरण कार्यालयास भेट देऊन माहिती घ्यावी व ६० % वीज बिल माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन आप्पासाहेब ढुस यांनी यावेळी केले.
प्रसंगी सहा अभियंता खेडकर साहेब, सहा अभियंता दुबे साहेब, सहा लेखापाल तिडके साहेब, उच्च लिपिक चोथे, महावितरण चे कॉन्ट्रॅक्टर शिंदे साहेब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *