


दादाच्या आईसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या आई असूनही कुठला बडेजाव नाही , गर्व नाही :-माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…


कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या मातोश्री यांनीही यापूर्वी घेतले जनार्धन स्वामी महाराज यांचे समाधीचे दर्शन दादाच्या आईसाहेब श्रीमती.आशाताई पवार यांनी माजी नगराध्यक्ष.मंगेश पाटील भगवती कॉलनी (कोपरगाव) येथे मागील काळात दोनदा कौटुंबिक सदिच्छा भेट दिली .याप्रसंगी माजी नगराध्यक्ष.मंगेश पाटील. म्हणाले की, . त्यावेळी बाबाजींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आश्रमात त्याचे समवेत मी ही गेलो होतो .



त्यांनी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्धन स्वामी महाराज समाधीचे , काशीविश्वनाथ महादेव भगवान , नर्मदा माता चे दर्शन घेतले ,तसेच त्यावेळी आश्रमात अनुष्ठान चालू होते , तेथे ही भेट दिली व मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांचे ही दर्शन घेतले..यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष कै. मोहनराव जी चव्हाण साहेब माधवराव पाटील (सिव्हिल इंजिनीयर) , मंगेश पाटील , मिलन पाटील , सुहासराव वाबळे , सौ.प्रियालक्ष्मी मंगेश पाटील , सौ.शिल्पा मिलन पाटील आदी उपस्थित होते.या भेटीनंतरच्या पुढील काळाच्या त्यां शिर्डीला ही आल्या होत्या, साईबाबांचे दर्शन घेतले ,त्यावेळीही मी बरोबर होते. कालच कोपरगाव भेटीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांनीही समाधीचे व रमेशगिरीजी महाराज यांचे, मा. नामदार हसन मुश्रीफ साहेब , मा. नामदार.आशुतोष दादा काळे साहेब यांचे समवेत आश्रमात येवुन दर्शन घेतले.दादाच्या आईसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या आई असूनही कुठला बडेजाव नाही , गर्व नाही , सेक्युरिटी नाही , अगदी साध्या व्यक्तिमत्त्व असणारी आई त्याच्या वागणूकीतून दिसल्या. त्यांची आश्रमाला भेट दिल्याची आठवनीचा उजाळा मिळाला असे माजी नगराध्यक्ष.मंगेश पाटील यावेळी म्हणाले आहे.

