कोपरगाव तहसील कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने…

Uncategorized

विविध मागण्या :प्रश्न मार्गी न लागल्यास अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा…

कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी कृति समितीच्या आवाहनानुसार अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.४) तहसील कार्यालयावर निदर्शने केली. यावेळी अंगणवाडी सेविकांना वेतनश्रेणी, वेतनवाढ व दरमहा पेन्शन, नवीन मोबाईल देणे, पोषण ट्रॅकर ऍप मराठीत देणे यासह विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी सरकारचे लक्ष वेधले. यावेळी कोपरगाव नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले. या प्रश्नी शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास मुबंई येथे सुरू असलेल्या अधिवेशनवर कृति समितीच्यावतीने मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनात म्हटले, केंद्रीय बजेट नुकतेच जाहिर झाले. बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. केंद्र सरकारने २०१८ मध्ये शेवटची वेतनवाढ तर महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांना शेवटची वेतनवाढ २०१७ मध्ये दिली आहे. सद्यस्थितीत वाढत्या महागाईत शासन देत असलेल्या तुटपुंज्या वेतनावर उदरनिर्वाह होणे अवघड आहे. त्यामुळे तातडीने वेतनश्रेणीसह वेतनवाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्य सरकारची प्रस्तावित सखी पेन्शन योजनेत अंगणवाडी कर्मचारी यांचेकडून कुठलेही अंशदान न घेता दरमहा पेन्शन द्यावी, दर्जेदार नवीन मोबाईल, मराठीत भाषेत पोषण ट्रॅकर अँप द्यावे व आयुक्त कार्यालयातुन शासनास पाठविलेले प्रस्ताव तातडीने मंजूर करावे मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी आंदोलन युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, अध्यक्षा कॉ. मदिना शेख, सहचिटणीस कॉ. जीवन सुरूडे, रागिनी जाधव, संजीवनी आम्ले, सविता नाईकवाडे, ताराताई संवत्सकर, पूनम खामकर, मंदाताई जोंधळे, मंगल सताळे, रेखा देवकर, सारिका गायकवाड, रेखा लबडे, सारिका सोनवणे, पौर्णिमा पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

फोटोओळी:-
कोपरगाव तहसील कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली.

फोटो ०५:- अंगणवाडी सेविका निदर्शने: कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *