

कोपरगाव प्रतिनिधी:- तहसिल कार्यालय कोपरगाव येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसीलदार श्री. योगेशजी चंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.


याप्रसंगी पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
