
कोपरगाव प्रतिनिधी:-
शिर्डी मध्ये नाईन अ साईड किक्रेट असोशिएशनचे पंच व प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर उत्साहाने संपन्न झाले.या प्रशिक्षणाचा समारोपाच्या अध्यक्ष स्थानी श्री.अविशान दंडवते विश्वस्त साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था हे उपस्थित होते. ते म्हणाले की मैदानात स्पर्धा चालु असतांना पंच व प्रशिक्षकांनी श्रध्दा व सबुरीचे आचरण करावे म्हणजे संघर्ष टळला जाईल आणि स्पर्धा निकोप वातावरणात पार पडतील.या राज्य नाईन अ साईड क्रिकेट असो.ला साईबाबा संस्थानच्या वतीने सर्वतोपरी थसहकार्य करण्याचे त्यांनी या प्रसंगी जाहिर केले.
शिर्डी येथिल के बी एस ग्रॕड हाॕटेल या ठीकाणी नाईन अ साईड क्रिकेट राज्य असोशिएशनचे वतीने पंच व प्रशिक्षक प्रशिक्षण दोन दिवस उत्साहाने संपन्न झाले.या शिबिराला महाराष्ट्रातुन विविध जिल्हातुन ३२ पंच व प्रशिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
या पंच व प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिराला पालघरचे महेबुब पठाण व पुणे येथिल मिलिंद क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
अहमदनगर जिल्हा नाईन अ साईड क्रिकेट असोशिएशनचे सचिव श्री.मकरंद को-हाळकर यांनी प्रास्ताविक करून प्रशिक्षणार्थी व तज्ञ मार्गदर्शक आदींना साईबाबाची प्रतिमा व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.राज्य असोशिएशनचे महासचिव श्री.अनिल सहारे यांनी या नवीन खेळाची ओळख सर्वाना करुन दिली.या सभेत पिंपरी चिंचवड येथे पुढील महीन्यात वरिष्ठ गट स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. याच वर्षात या खेळाचा प्रसार व प्रचार करुन लवकरच राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचे असे ठरविण्यात आले.
या प्रसंगी निळकंठ कुलकर्णी,राजेंद्र कुलकर्णी ,प्रा.शिवाजी भिंताडे,मंबईचे शरद वाबळे,केबीएस ग्रॕड हाॕटेलचे दिलीप वाघचौरे ,अहमदनगर नाईन अ साईड क्रिकेट असो.चे सचिव ज्ञानेश्वर भोत,कुणाल गुंगले आदि उपस्थित होते.सुत्रसंचलन जय बोभाटे तर आभार रवि बारापत्रे यांनी मानले.
