शिवरायांच्या विचाराची आज गरज:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
छत्रपती शिवाजी महाराज भोसले या भुतलावर एक आदर्श राजे होवुन गेले त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आज आपल्यासमोर शिवविचाराने उभे आहे तेंव्हा शिवरायांच्या विचारांची आज सर्वानाच गरज आहे असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. शिवजयंतीला सणाचे स्वरूप प्राप्त झाले असून तरूणाईने तो साजरा करण्यात कुठेही कसुर केलेली नाही असेही ते म्हणाले.
कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पार्टी, संजीवनी युवा प्रतिष्ठान, भाजपा शिवसेना गटनेत्यांच्यावतींने व शहरातील विविध सांस्कृतिक सामाजिक संघटनांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती शनिवारी साजरी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाचे विवेक कोल्हे यांनी विधीवत पुजन केले.
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना आई जिजाउंच्या शिकवणीला सर्वोच्च प्रधान्य दिले, करारी, जीवाची बाजी लावुन लढणारे मावळे आणि शिवरायांचा विचार घेवून मार्गक्रमण करणा-या तरूणाईच्या साथीने जगात मोठा इतिहास घडविला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची दिशा आणि प्रजेचे कल्याण साधण्यासाठी त्यांनी नानाविध योजनांची आखणी करून त्या प्रत्यक्ष अंमलात आणल्या. त्यामुळे शिवाजी राजांचा इतिहास ३९२ वर्षे होवुनही आपल्यासमोर जीवंतपणे उभा आहे तो विचार समाजकारणांत सतत तेवत ठेवावा.
याप्रसंगी सेनेचे गटनेते योगेश बागुल, कैलास जाधव, भाजपा गटनेते रविंद्र पाठक, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, पराग संधान, विजय आढाव, केशव भवर, अरिफ कुरेशी, अविनाश पाठक, सागर जाधव, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, राजेंद्र सोनवणे, रविंद्र रोहमारे, जनार्दन कदम, वैभव गिरमे, दिनेश कांबळे, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे संचालक प्रदिप नवले, बाळासाहेब नरोडे, रिपाईचे दिपक गायकवाड, विवेक सोनवणे, दिपक जपे, गोपी गायकवाड, राहुल सुर्यवंशी यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले.

फोटोओळी:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ वी जयंतीनिमीत्त शहरातील अश्वारूढ पुतळयाचे पुजन करतांना जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *