
कोपरगाव प्रतिनिधी:-
क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे सशस्त्र क्रांती जसे प्रेरणादायी आहे तसेच लहुजीचे शैक्षणिक कार्य देखील क्रांतिकारी आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केले
क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या १४१ पुण्यतिथी निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले

या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की, स्वतंत्र पूर्व काळात लहुजी साळवे यांनी ब्रिटिशां विरुद्ध ज्या प्रमाणे क्रांतिकारक तयार करण्यासाठी सशस्त्र लढा उभा केला त्या प्रमाणेच अस्पृश्य जनतेस शिक्षणाची बंदी असताना क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांनी सर्वसामान्य जनतेस शिक्षण देण्यासाठी शाळा उघडल्या असताना त्यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजी साळवे यांनी संरक्षण पुरवले एवढेच नव्हे तर आपली पुतणी मुक्ता साळवे हिचा या शाळेत प्रवेश घेतला व तिला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली या वरून त्यांच्या सशस्त्र क्रांतीच्या विचारा सारखेच शैक्षणिक कार्य देखील महान व क्रांतीकारी आहे
या वेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल,अर्जुन मरसाळे,निसार शेख सचिन अहिरे दिपक आरणे आदी उपस्थित होते
