सडे-शिंगवे शिवरस्त्यांचे ना. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून उजळले भाग्य…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील सडे-शिंगवे शिवरस्त्याचे ना. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून भाग्य उजळले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या या रस्त्याची ना. आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नातून दर्जोन्नती होऊन या मार्गाला प्रमुख जिल्हा मार्ग दर्जा देण्यात आला आहे. या रस्त्याला ना. आशुतोष काळे यांच्या निधीतून १० लाख रुपये निधी मिळाला आहे. या निधीतून मारुती मंदिर ते चांगदेव बारहाते घर रस्ता (सडे-शिंगवे शिवरस्ता) मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. तसेच यावेळी सडे येथे २४ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रावसाहेब बारहाते घर ते युवराज देठे घर रस्ता मजबुतीकरण कामाचे देखील भूमिपूजन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

ना. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे भाग्य उजळले असून औरंगाबाद जिल्ह्यातून शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांना साईपालख्या घेवून येण्यासाठी हा सडे-शिंगवे शिवरस्ता अतिशय महत्वाचा आहे. मात्र मागील काही वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे साईभक्तांना व पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मतदार संघाचा लोकप्रतिनिधी व साईबाबा संस्थांनचे अध्यक्ष या नात्याने ना. आशुतोष काळे यांनी या रस्त्याचा प्रश्न धसास लावला आहे. हा रस्ता लवकरच डांबरीकरण होणार आहे. त्यासाठी प्रजीमाच्या निकषानुसार प्रस्ताव दाखल केला असून लवकरच निधीची तरतूद होणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे वारी, कान्हेगाव, सडे, शिंगवे, रुई, कोहकी, कोकमठाण आदी गावातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, रमेश वाकचौरे, रावसाहेब बारहाते, गणपत बारहाते, विजय बारहाते, अशोक बारहाते, सुनील बारहाते, गणेश बारहाते, रामभाऊ बारहाते, चांगदेव बारहाते, शशिकांत बारहाते, ज्ञानदेव बारहाते, संदीप बारहाते, राहुल जगधने, अक्षय वाकचौरे, अनिल बारहाते, नानासाहेब बारहाते, दत्तात्रय बारहाते, सरपंच अजित कोताडे, उपसरपंच सुनील बारहाते, नारायण लोहकणे, बाबासाहेब बारहाते, माणिकराव बारहाते, दगडू बारहाते, पद्माकर सुरळकर, ज्ञानदेव चौधरी, भाऊसाहेब जाधव, जनार्दन बोर्डे, बाबासाहेब कवडे, मच्छिन्द्र चौधरी, सुभाष चव्हाण, नानासाहेब जाधव, अशोक चौधरी, गोवर्धन बर्गे, सिताराम पगारे, सुभाष चौधरी, उत्तम नळे, संजय जाधव, शिवाजी फाटे, सुभाष चौधरी, अशोक सुरळकर, बबनराव चौधरी, राधाकीसन चौधरी, साईनाथ पगारे, बाळासाहे चौधरी, प्रविण चौधरी, पोपट चौधरी, नारायण शेळके, राहुल चौधरी, विलास निकोले, गनी शेख, विकास चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे, गाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ:-
सडे-शिंगवे शिवरस्त्याचे मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी ना. आशुतोष काळे समवेत मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *