शिंगणापूरच्या भिमा संवत्सरकरांची जनार्दन स्वामी आश्रमाच्या अन्नदानासाठी ५५ हजाराची देणगी…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देवुन त्यातुन अध्यात्म कोपरगांव बेट भागात त्यांच्या समाधीस्थानावर येणा-या भाविकासाठी दोन वेळचे मोफत अन्नदान उपक्रम आश्रमात सुरू करण्यात आला असुन त्यास दानशुर मंडळींनी मदतीचा हात पुढे करावा या प. पू. रमेशगिरी महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिंगणापुर येथील सामाजिक कार्यकर्ते भीमा संवत्सरकर यांनी ५५ हजार रुपयांचा धनादेश सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक अरुण येवले, फकिरराव बोरनारे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान केला.
प्रारंभी श्री. भिमा संवत्सरकर म्हणाले की, कोपरगाव बेट भूमीला गुरु शुक्राचार्य यांचा अध्यात्मिक वारसा असून कचेश्वर देवयानी आख्यान येथे घडले. कचेश्वरी केलेला नमस्कार त्र्यंबकेश्वरला पोहोचतो., ऐतिहासिक पौराणिक महत्त्वiसाठी कोपरगाव तालुका प्रसिद्ध आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग थांबले, त्यात अनेक निरपराध व्यक्ती बळी पडल्या. यात अध्यात्माची भक्ती करून मनाची एकाग्रता वाढविण्याची महती समजली. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मुख्य विश्वस्थ रमेशगिरी महाराज यांनी असंख्य भाविकांना नर्मदा, गोदावरी परिक्रमेचे महत्व पटवून देत लॉकडाउन काळात असंख्य परिक्रमा घडवून आणल्या. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी शिव मंदिर पुनर्स्थापना करून त्यातुन अध्यात्म संस्कार फुलविण्याचा प्रयत्न केला. प.पू. रमेशगिरी महाराज हे राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या अध्यात्म प्रसाराची धुरा उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. काशी विश्वनाथ महादेव ट्रस्ट अंतर्गत गोपालनही त्यांनी सुरू केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत थोरात, लक्ष्मण साबळे यांनी केले, ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे यांनी आभार मानले. सुप्रसिद्ध गायक अरुण भैय्या पगारे यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी व प. पू. रमेशगिरी महाराजांवर रचलेली भजने सादर केली.

फोटोओळी कोपरगांव:-
कोपरगाव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम समाधीस्थान अन्नदानासाठी शिंगणापुर येथील सामाजिक कार्यकर्ते भिमा संवत्सरकर यांनी ५५ हजार रूपयांचा देनगी धनादेश प. पू. रमेशगिरी महाराज यांना सुपुर्द केला. याप्रसंगी संचालक अरूण येवले, फकिरराव बोरनारे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *