प्रभागातील गटार न करता येणाऱ्या अज्ञानी उपनगराध्यक्षाची लोकप्रतिनिधिंवर टीका करायची लायकी आहे का?:- मंदार पहाडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- मागील साडेचार वर्षात आपले काय काम आहे हेच कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांना समजले नाही. जनतेने शहर विकासासाठी निवडून दिले फक्त निवडूनच दिले नाही तर बहुमत देखील दिले. मात्र आपल्या नेत्याच्या आदेशावरून कोपरगाव शहराचा विकास होवूच द्यायचा नाही असा पवित्रा घेणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नेहमीच शहरविकासात खीळ घातली आहे. त्यामुळे शहरातील जनतेचा भ्रमनिरास झाला असून येणाऱ्या निवडणुकीत जनतेपुढे कोणत्या तोंडाने जायचे याची पंचाईत झाल्यामुळे ते आता बरळत आहे. ज्या अज्ञानी उपनगराध्यक्षाला
आपल्या प्रभागातील गटार करता आली नाही त्यांना विकासाचे व्हिजन असलेल्या आमदार आशुतोष काळेंवर टीका करायची लायकी आहे का अशी खोचक टीका मंदार पहाडे यांनी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांच्यावर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पहाडे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत कोल्हे गटाचे, उपनगराध्यक्ष कोल्हे गटाचा, सगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष कोल्हे गटाचे, सर्व कमिट्यांचे अधिकार यांच्याकडे असतांना देखील विकासकामांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी आजवर विकासकामांना विरोधच केला आहे. विकासाचे व्हिजन असलेले आमदार आशुतोष काळे यांनी विकासकामांना पाठिंबा देण्यासाठी साठी नगराध्यक्षांना पाठिंबा दिला होता. परंतु सगळ्या कमिटीचे अध्यक्ष यांचे आहे.त्यांच्या अध्यक्षांच्या सुचननेनुसारच काम चालते मात्र विकासाशी देणघेण नसलेल्या कोल्हे गटाच्या नगसेवकांनी आजवर कमिटीच्या मिटिंग घेतल्या नाही. मागील निवडणुकीत प्रचारासाठी विद्यमान मुख्यमंत्री आणून देखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव फारच जिव्हारी लागला. व निष्क्रिय माजी लोकप्रतिनिधींना विधानसभा निवडणुकीत शहारतील जनतेने त्यांची जागा दाखवून दिल्यामुळे त्यामध्ये अजून भरच पडली. शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्याच्या कोल्हेंच्या आदेशावर कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विकासकामांना विरोध केला मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता जिल्हाधिकाऱ्यांनी विकासकामांना परवानगी दिल्यामुळे त्यांचा आणखीनच तिळपापड झाला. त्यामुळे सत्तेच्या मस्तीत न्यायालयात जावून २८ कामांना स्थगिती आणाऱ्यांचा बुरखा फाडल्यामुळे त्यांचे खरे रूप शहरवासियांना दिसून आले असल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे लायकी नसलेले बरळत असून बोलके पोपट बरळतात सुद्धा हे आजच माहिती झाले असल्याचे पहाडे यांनी शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *