ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांना मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली…

कोपरगाव

राहूल बजाज यांचे देशासाठी सामाजिक दृष्ट्या महत्वपूर्ण योगदान:-मंत्री छगन भुजबळ…

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी:- मंत्री छगन भुजबळ..

कोपरगाव प्रतिनिधी
(मुंबई,नाशिक):-
बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वां ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, अशा शब्दात शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
शोक संदेशात छगन भुजबळ म्हणतात, देशाच्या उद्योग क्षेत्रात ५० वर्षाहून अधिक काळ ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी काम केलं. देशातील उद्योग विश्वाला मोठ्या उंचीवर नेण्यासोबत एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यात त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे. त्यांचा उद्योग क्षेत्रातील प्रदीर्घ अभ्यास अनुभव याच्या जोरावर बजाज उद्योग समूहाला उंचीवर नेऊन ठेवले. उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक भान जपत त्यांनी सामाजिक दृष्ट्या देशासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.
ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योग जगतातील एक तारा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने बजाज कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय बजाज कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *