
कोपरगाव प्रतिनीधी:-
सर्व सामान्य
माणसाला परवडणारी बस सेवा गेले तीन महिने ठप्प झाली आहे अनेक प्रवाशांना मोलमजुरी साठी ग्रामीण भागात वा दुरचया गावी जावे लागते परंतु बसच्या संपामुळे खाजगी वाहनाने जिवघेणा प्रवास करावा लागतो आहे खासगी वाहनचालक मनमानी भाडे आकारणी करून आर्थिक लुट वा अडवणूक करीत आहेत
अनेक महाविद्यालयांमध्ये मुले आणि मुली नोकरदार वर्ग जेष्ठ नागरिक अनेक कामानिमित्ताने वारंवार तालुक्यात वा जिल्ह्यातील ठिकाणी जावे लागते परंतु बसच्या संपामुळे अडचणीचा सामना करावा लागतो आहे खासगी प्रवासी वाहतूक किंवा मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचा सहारा घेण्याशिवाय पर्याय नाही किती दिवस असा जीवघेणा प्रवास करावा लागणार हे येणारा काळच ठरवेल अशी प्रवाशांची धारणा झाली आहे
