

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय संस्कृती चा सर्व जगात एक वेगळेपणा नेहमीच जाणवतो याच्या पाठीमागे आहे भारताला लाभलेला हस्तकलेचा वारसा, ज्या भावना जे विचार शब्दात सांगता येत नाहीत मांडता येत नाहीत ते अनेकदा कलेच्या माध्यमातून व्यक्त होतात आणि ते खूप परिणाम कारक असतात कारण यामध्ये भाषा ही कलेतून व्यक्त होते कलेमुळे आपले जीवन आनंदी उत्साही आणि समृद्ध होते कलेच्या माध्यमातून लोक एकत्र येतात आणि त्यातून संस्कृती संगोपन होते कला जतन करण्याची एक जागतिक परिभाषा निर्माण होते
कोणत्याही समाजामध्ये मग तो सुशिक्षितांचा अशिक्षितांचा मागासलेला किंवा सुसंस्कृत पुढारलेला असो कलानिर्मिती ही एक पॅशन आहे कलेचा विकास हा कोणत्याही शास्त्रीय ठोस कारणांनी होतो असे नाही तर भौगोलिक परिस्थिती आणि ऐतिहासिक वारसा हा हि यास कारणीभूत आहे आता या हस्तकलेतून हस्तव्यवसाय निर्माण होतो आहे भारतीय आर्थिक उलाढाली मध्ये हस्तकलेचे खूप मोठे योगदान आहे
, भारतीय हस्तकलेला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे भारतीय संस्कृती ही सिंधू संस्कृतीपासून ऐतिहासिक पुरावे जतन करून आहे आणि यात प्रामुख्याने हस्ते कलेतून ती जतन झाली आहे हस्तकलेच्या वस्तू निर्मितीतून उपजीविका करणारे लाखो लोक आज भारतीय हास्य कलेचा एक अविभाज्य घटक आहेत भारतीय संस्कृती ही परकीय आक्रमणे ऐतिहासिक सामाजिक आणि भौगोलिक स्थित्यंतरे पेलताना हस्तकलेच्या माध्यमातून जिवंत राहिली आहे मौर्यांच्या काळातील सांची स्तुपा सारखे अनेक हस्तकलेचे नमुने आज पहावयास मिळतात या स्तूपावर नखशिकांत दागिन्यांनी मढलेल्या स्त्रियांची शिल्प दिसून येतात आणि दागिन्यांची हस्तकलेचे अद्भूत नमुने त्या काळात उदयास आलेले दिसून येतात भारतीय हस्तकलेला त्या त्या काळातील राजे-महाराजे सत्ताधीश यांनी मात्र प्रोत्साहन दिलेले आहे आणि म्हणूनच भारतीय संस्कृती हस्तकलेच्या माध्यमातून आज ही जिवंतपणा अनुभवताना दिसते आहे
, आज हस्तकला राजस्थान बांधणी रंगकाम हुपरीतील चांदी हस्तकला गुजरात राज्यातील लाकडी कोरीव काम कश्मीर मधील कशीधा आसाम मधील बांबू वरील काम कर्नाटकातील रेशमी कडे किड्यांची पैदास आणि धागा निर्मिती
आंध्र प्रदेश मधील काही भागात केळीच्या खोडांवर प्रक्रिया करून धागा निर्माण करुन बनाना पीठ सिल्क साडी तयार केली जाते, जगाच्या इतिहासात दिमाखाने मिरवणारी येवला पैठणची पैठणी अशा कितीतरी गोष्टी हस्तकलेचे तून दिवाणखाना स्वयंपाक खोली आणि साजशृंगार यामध्ये आपली विशिष्ट ओळख निर्माण करत आहेत.
आज आज मी तेलंगणातील हस्तकलेचे एक माहेरघर असलेलं पोचंपली गावांमध्ये आली आहे आज पोचंपली ची एक वेगळी ओळख म्हणजे पोचंपली इकत सिल्क साडी अथवा पट्टु साडी. भारतीय महिले च्या कपाटात आगळीवेगळ स्थान आज या साडीला निर्माण झाले आहे साडी बनवण्याची अनोखी कला आज प्रत्यक्षात जवळून पाहण्याचा दुग्धशर्करा योग भारतीय हस्तकलेच्या विशिष्ट दिवसा दिवशी आलेला आहे साडी घेताना आपण महिला किती नखरे आणि विचार करतो पण त्या पाठी मागचे कष्ट जर आपण पण जवळून पाहिले तर लक्षात येते किती मोठी यंत्रणा यामागे काम करत असते आज राष्ट्रीय हस्तकलेचा दिवस आणि गेली 17 वर्षं पैठणी आणि इतर हस्तकला निर्मित साडी यांच्या माध्यमातून हस्तकला जिवंत ठेवण्याची एक तळमळ खऱ्या अर्थाने खारीच्या वाट्याने उचलत आहे याचा सार्थ अभिमान शुभांगी सिल्क साडी च्या सर्व घटकांना आहे आणि म्हणूनच आजच्या या दिवसाच्या शुभेच्छा देऊन एक संकल्प करूया
हस्तकला जपूया आणि देशाला अजून समृद्ध बनवूया शुभांगी थोरात
शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक
रेस कोर्स नाका संभाजी नगर कोल्हापूर
पिन कोड 416012
9850977645
