कोपरगांव प्रतिनिधी:-
सद्य काळाची आधुनिकता, वेळेची बचत, पारदर्शकता, तत्परता आणि सचोटीचा विश्वास या पंचसुत्रीचा अवलंब करत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांने साखर कारखानदारीबरोबरच रासायनिक उपपदार्थ निर्मीतीत राज्यांत नावलौकीक मिळविला असून लवकरच देशात अग्रमानांकित कारखाना म्हणून कोल्हे कारखान्यांची गणना होईल असा विश्वास तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी व्यक्त करून जिल्हयात कोल्हे कारखाऱ्यांने सर्वाधिक उसाचा भाव दिला. अहमदनगर जिल्हयात सर्वप्रथम मोबाईल अॅपद्वारे केन हार्वेस्टींग व अॅटो व्हेईकल नंबर टॅग रिडर सिस्टीम प्रणाली सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याने सुरू केली असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी काळाची पावले ओळखुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत सहकारी साखर कारखानदारीत सर्वप्रथम अनेक पायलट प्रकल्प सुरू करून ते यशस्वी करून दाखविले, तोच ध्यास अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांच्याकडे असुन त्यांनी यावर कळस चढविण्याचा प्रयत्न संचालक मंडळ, व्यवस्थापन, उस उत्पादक सभासद, शेतकरी, सर्व ज्ञात अज्ञात सहका-यांच्या साथीने मार्गक्रमण करत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांला देशात नावारूपाला आणण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे.
याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक साहेबराव कदम, संजय होन, प्रदिप नवले, ज्ञानेश्वर परजणे, निवृत्ती बनकर, शिवाजीराव वक्ते, राजेंद्र कोळपे, बाळासाहेब नरोडे, अशोक भाकरे, राजेंद्र भाकरे, वाल्मीक भास्कर, चंद्रभान रोहोम, गोपी गायकवाड, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, चीफ इंजिनियर कुशलेशकुमार शाक्य, चीफ केमिस्ट विवेककुमार शुक्ला यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, उस उत्पादक सभासद शेतकरी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार, उसतोडणी वाहतुकदार आदि उपस्थित होते.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने संघर्षातुन स्वत:ला सिद्ध केले आहे. अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी आधूनिकीकरणाचा विडा उचलला असुन हा कारखाना भारतात अग्रगण होण्यासाठी छोटी छोटी पावले टाकत आहे. सर्वच कामात पारदर्शकतेला महत्व देवून सभासद शेतक-यासह उसतोडणी वाहतुकदारांना एकाच स्मार्टकार्डद्वारे सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा संकल्प केला आहे. महिंद्र अँड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने देशात सर्वप्रथम सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याने उपग्रहाद्वारे उस क्षेत्र सर्वेक्षण सुरू केले आहे. सभासद शेतक-यांना उच्च दर्जाचे निरोगी को ८६०३२, एम एस १०००१, व्हीएसआय १२१२१ को ११०१५, कोसी ६७१ को व्ही एस आय ०३१०२ जातीचे उस बेणे देवुन हेक्टरी उस उत्पादन व साखर उतारा वाढविण्याचा ध्यास घेवुन आगामी हंगामात दैनंदिन ६ हजार में टन उसाचे गाळप करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय संचालक मंडळ व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून घेवू असेही ते म्हणाले. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले



फोटोओळी:-
कोपरगाव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने अहमदनगर जिल्हयात सर्वप्रथम मोबाईल अॅपद्वारे केन हार्वेस्टींग व अॅटो व्हेईकल नंबर टॅग रिडर सिस्टीम प्रणाली सुरू केली असुन त्याचे उद्घाटन तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार व सर्व संचालक उपस्थित होते.
