हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने प्रभाग क्र.५ मध्ये विकास कामांचे उद्‌घाटन सोहळा समारंभ:- योगेश बागुल…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील प्रभाग क्रंमाक ५ मध्ये नगरपालिका हद्दीतील विकास कामांचे उदघाटन सोहळा दि.२३ जानेवारी २०२२ रोजी हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्ताने आयोजित केला आहे.या प्रसंगी हिदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे.प्रभाग क्रमाक ५ मधील जवाहर मेडिकल ते भारतप्रेस रोड, सुवर्ण जयंती नगरस्थान योजना काँक्रिटी करण , प्रशांत चव्हाण घर ते गोकुळशेठ गंगवाल घर दलिते तर योजना काँक्रिटीकरण, महावीर भवन मंदिर परिसर पेव्हींग ब्लॉक बसविणे,आजित कुलकर्णी ते विनोद डागा घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटी करण कामाचे उदघाटन विवेक भैय्या बिपिनदादा कोल्हे चेअरमन औद्योगिक वसाहत कोपरगांव,सौ. ऐश्वर्याताई संजयराव सातभाई मा. नगराध्यक्षा कोपरगांव, योगेश तुळशीदास बागुल शिवसेना गटनेते, मा. उपनगराध्यक्ष, कोपरगांव यांच्या शुभहस्ते होणार आहे संत ज्ञानेश्वर माऊली व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपरगांव, जि. अ. नगर याठिकाणी दि. २३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०:३० हा कार्यक्रम सोहळा होणार असुन या कार्यक्रमासाठी नागरिक बंधु भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन मा.उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *