
कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- देश-विदेशात सुप्रसिद्ध असलेल्या व कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असलेल्या आ. आशुतोष काळे यांना महाराष्ट्र सरकारकडून ‘राज्यमंत्री दर्जा’ जाहिर करण्यात आला. हि बातमी कार्यकर्त्यांना समजताच कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त करीत जल्लोष केला आहे.
महाराष्ट्र शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करून श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे. त्याचा आनंद कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज व महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कोपरगाव शहरातील नागरिकांना पेढे वाटप करीत आपला आनंद साजरा केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयश्री मिळविल्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरु केला आहे. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची जबाबदारी, श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली व नुकताच शासनाकडून त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देखील देण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला तो आनंद कार्यकर्त्यांनी साजरा केला.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअमरन गोरक्षनाथ जामदार, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष, महिला पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
