
कोपरगांव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांना कोरोनाचा त्रास जाणवु लागल्याने त्यांच्या आरोग्यासाठी मुर्शतपुरवासियांनी तेथील हनुमंताला साकडे घालुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे व त्यांच्या सहका-यांनी महाआरती केली व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी सर्वश्री. पोलिस पाटील गोरक्षनाथ दवंगे, साहेबराव शिंदे, रामदास शिंदे, मधुकर उगले, अन्वरभाई शेख, माजी सरपंच संदिप उगले, दिलीप शिंदे, सुधाकर शिंदे, नानाभाउ शिंदे, संदिप गुरूळे, कर्णासाहेब शिंदे, प्रकाश दवंगे, सुहास दवंगे, अरिफभाई शेख, सिताराम तिपायले, दत्तात्रय चौधरी, असलम शेख, गंगाधर कुदे, राजेंद्र काळे, राजेंद्र दवंगे, जगन्नाथ दवंगे, देवराम दवंगे, रंगनाथ घोटेकर, नवनाथ उगले, बाळासाहेब आवारे, भाउसाहेब बारहाते आदि परिसरातील नागरिक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
