
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोरोनाचे संकट दुसऱ्या लाटेत एवढं भयावह होत की साधे बेड देखील रुग्णांना मिळत नव्हते तेव्हा जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे हे दिवसरात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झगडत होते मात्र अलीकडेच त्यांना कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा झाली आहे मात्र या संकटातून त्यांना लवकर आराम वाटून पुन्हा जनसेवेचा झंजावात सुरू होईल अशी भावना भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष श्री.मुकुंदमामा काळे यांनी दिली आहे.
आपला माणूस म्हणून प्रत्येकाला जपन्याचे काम सुरू होते…खाजगी हॉस्पिटललाही ऑक्सिजन पुरवठा,मोफत रुग्णवाहिका सेवा,मोफत औषधोपचार,स्वतःच्या खर्चाने खाजगी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करून आय.सी.यु कक्ष उभारून नागरिकांना उपचार सुविधा दिली.सॅनिटायझर,मास्क यांचे मोफत वाटप करून कोविड जनजागृती केली,औषध फवारणी,निर्जंतुकीकरण कक्ष उभारणी,मोफत अन्नछत्र असे महत्वाचे काम अविरत सुरू ठेवले.
स्वतःच्या जीवाची काळजी न करता रोज संजीवनी कोविड सेंटरला जाऊन आस्थेने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आधार दिला,माणूस चिंतेत यायचा तो बरा होऊन घरी जातांना मात्र चेहऱ्यावर वेगळा आनंद असायचा कारण विवेकभैय्या नावाचं कुटूंब पाठीशी उभ असल्याच बळ त्याच्या आजारावर जास्त गुणकारी ठरत होते.
कोरोनाचे वातावरण सावरते न सावरते तोच पूरस्थिती निर्माण होऊन महाराष्ट्र हादरला,अनेक भूभाग पाण्याखाली गेले,कित्येकांचे स्वप्न आणि प्रपंच अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेले.अशा कठीण काळात विवेकभैय्या यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांना सोबत घेऊन चिपळूण गाठले.मदतीसाठी किराणा वस्तू,कपडे,स्वच्छता साहित्य,पाणी असे असंख्य साहित्य घेऊन मदतकार्य सुरू केले,स्वतः मैदानात उतरुन काम केले कारण या व्यक्तिमत्वाला ज्यांनी जवळून अनुभवले आहे त्यांना ठाऊक आहे की बडेजाव न बाळगता जनसेवेचे काम करण्याची आवड व साधेपणा आणि सामंजस्य यांचे उत्तम उदाहरण म्हणजे युवानेते विवेकभैय्या कोल्हे.
संकट कोणतेही असो संजीवनी समूह व कोल्हे परिवार हे सर्वप्रथम धावून येतात.विवेकभैय्या यांचा प्रथम मानस हा असतो की राजकीय गट तट हे न बघता संकटात असेल कोणी तर त्याला त्यात सहकार्य करणे ही खरी जनसेवा ते मानतात.हजारो दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी विवेकभैय्या यांनी मोठे सहकार्य आजवर केलेलं आहे व या कामाचे आशीर्वाद त्यांना जनतेने दिलेले आहेत.हे सर्व समाधान आम्हाला दिव्यांग बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर कायम दिसते.
कोरोनाच्या संकटात विवेकभैय्या यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांना लवकर यातून बरे वाटून पुन्हा नव्या ताकतीने हे जनसेवेचे वादळ सुरू होईल यावर आपला विश्वास आहे.संकट आले म्हणून शांत बसतील यातले विवेकभैय्या नाहीत..अशा लढवय्या युवनेतृत्वाला सलाम अशी प्रतिक्रिया मुकुंदमामा काळे यांनी व्यक्त केली आहे.
