संजीवनी बी. फार्मसी राज्यातील १ली (प्रायव्हेट) व देशातील ९ वी ऑटोनाॅमस संस्था:-श्री.अमित कोल्हेेे…

कोपरगाव

संजीवनीची अग्रभागी राहण्याची परंपरा कायम, शिरेपेचात मानाचा तुरा..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-
आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग जगताला आधुनिक ज्ञानाधिष्ठीत फार्मासिस्टस् देण्यासाठी संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाने शैक्षणिक स्वायत्त (अकॅडमिक ऑटोनाॅमस) संस्थेचा दर्जा प्राप्त केला असुन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासुन प्रथम वर्षासाठी नव्याने तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम असणार आहे. आणि विध्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीच पदवी मिळणार आहे. संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाने शैक्षणिक स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त करून विनाअनुदानित वर्गवारीत संजीवनी ही महाराष्ट्रात पहिली स्वायत्त संस्था ठरली आहे, तसेच देशातील नववी संस्था असुन या उपलब्धीने संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री. कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की देशात एकुण ११४६ बी. फार्मसी महाविद्यालये असुन त्यातील २५ सरकारी आहेत. महाराष्ट्रात एकुण १८५ बी. फार्मसी महाविद्यालये आहेत, त्यातील फक्त ४ शासकिय महाविद्यालये आहेत. देशात आंध्र प्रदेशात ४, पंजाब मध्ये २, महाराष्ट्र
व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १ अशा एकुण ८ स्वायत्त संस्था होत्या. आता संजीवनी बी. फार्मसी ही देशातील ९ वी स्वायत्त संस्था म्हणुन पुढे आली आहे. तर खाजगी विनाअनुदानित वर्गवारीमध्ये संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाने महाराष्ट्रात सर्वात प्रथम स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त करून एक क्रांतिकारी पावुल टाकले आहे.
विध्यार्थ्यांना भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळण्यासाठी आधुनिक औषधनिर्माण ज्ञान समावेशक अभ्यासक्रम शिकविणे व काळानुरूप तो अपडेट करणे हा मुख्य गाभा आहे. उत्कृष्ट अभ्यासक्रम ठरविण्यासाठी ऊद्योग जगत, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती व संस्थेचे माजी विध्यार्थ्यांची समिती तयार करून नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. आता विध्यार्थ्यांना बी. फार्मसीची पदवी पुर्ण केल्यावर पुर्वीप्रमाणेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्याच पदव्या मिळणार आहे.
सध्य परीस्थितीमध्ये विद्यापीठाचा कार्य विस्तार वाढल्यामुळे परीक्षांचे निकाल वेळेत न लागणे, पुर्नमुल्यांकनाचे निकाल अगदी पुढील परीक्षांच्या तोंडावर लागणे, यामुळे विद्यार्थांना पुढील वर्गातील प्रवेशाचे अडथळे निर्माण होत असे. मा़त्र आता संजीवनीला शैक्षणिक स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यामुळे परीक्षांचे निकाल वेळेतच लागणार आहे. आणि एखादा विद्यार्थी एखाद्याा सत्र परीक्षेमध्ये एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला १५ दिवसांच्या आत पुन्हा परीक्षा देवुन उत्तिर्ण होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांचे वाया जाणारे वर्ष वाचु शकणार आहे.
संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालय हे मागील अनेक वर्षांपासून सतत एन.बी.ए. मानांकन, एनआयआरएफ रॅन्क बॅण्ड ७६-१०० व अटल रॅन्क प्राप्त संस्था असुन, उत्कृष्ट निकाल, पुणे विद्यापीठात चांगल्या गुणांनी विद्यार्थी उत्तिर्ण होण्याची अखंड परंपरा, नियमानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव असणारा प्राद्यापक वर्ग, सुसज्य ग्रंथालय आणि प्रयोगशाळा , सर्व सोयींनी युक्त वसतिगृहे, भव्य क्रीडांगणे, विद्यार्थी व शिक्षकांनी विविध क्षेत्रात मिळविलेले यश आणि संजीवनीच्या माध्यमातुन विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये मिळणाऱ्या नोकऱ्या या सर्व बाबींमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) सर्व निकष पुर्ण झाले आणि या महाविद्यालयास शैक्षणिक स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त झाला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री. नितीनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे, टेक्निकल डायरेक्टर श्री विजय नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डाॅ. किशोर साळुंखे, समन्वयक डाॅ. सरीता पवार, सर्व विभाग प्रमुख व सर्व प्राद्यापकांनी संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचा उत्तम दर्जा राखला आणि देश पातळीवर नावलौकिक प्राप्त केला. सर्वांचे व्यवस्थापनाकडून अभिनंदन करण्यात आले.

फोटो ओळीः-
संजीवनी अभियांत्रिकी बी. फार्मसी शैक्षणिक स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विजय नायडू यांनी प्राचार्य डाॅ. किशोर साळुंखे, डाॅ. सरीता पवार व विभाग प्रमुख व प्राद्यापक यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *