कोपरगावातुन भाजपा युवामोर्चाच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना एक हजार पत्र रवाना विद्यापीठ सुधारणा काळे विधेयक मागे घ्या…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
राज्यातील महाविकास आघाडी शासनाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चालु हिवाळी अधिवेशनात अनाधिकाराने विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल केला तेव्हा हे काळे विधेयक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी पोष्टकार्डद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोपरगांवातुन भाजपा युवा मोर्चाच्यावतीने करण्यांत आल्याची माहिती उत्तर नगर जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ साठे, उत्तर नगर जिल्हा सचिव गणेश भिंगारे, तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी दिली.
विद्यापीठे ही विद्येची पवित्र मंदिरे आहेत मात्र त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांची सोय लागावी त्यातुन राजकीय पोळी भाजली जावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कुठलाही अभ्यास न करता या विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यांचे काळे विधेयक ऐनवेळेस विधीमंडळात आणून लोकशाहीचा अपमान केला आहे. त्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड भूमिका मांडत त्याला कडाडुन विरोध केला व भाजपाच्यावतीने राज्यात हल्लाबोल करून याबाबत जागृती करण्यांचे सुतोवाच केले होते त्याचाच एक भाग म्हणून भाजपा युवामोर्चाच्यावतीने हे अभियान घेण्यात आले.
याप्रसंगी युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष मनिंदरसिंग भाटीया, रविंद्र लचुरे, सुनिल पांडे, बाबासाहेब पाचोरे, रमेश रहाणे आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *