
कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेचे वतीने आमदार आशुतोष काळे यांची श्री साईबाबा संस्थान व्यवस्था,शिर्डीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व अॅड. रविंद्र बोरावके यांची भारत संचार निगम लि. चे संचालकपदी निवड झालेबद्दल सत्कार समारंभ नुकताच पिपल्स बँकेचे सभागृहात पार पडला.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी प्रास्ताविक करून त्यांचे स्वागत व निवडीबद्दल अभिनंदन केले. बँकेचे जेष्ठ संचालक कैलासचंद ठोळे यांनी भारतातील जगप्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र श्री साईबाबा संस्थान हे दोन नंबरचे तीर्थक्षेत्र समजले जाते अशा श्री साईबाबा संस्थानवर आमदार आशुतोष काळे यांची झालेली निवड तसेच अॅड. रविकाका बोरावके यांची भारत संचार निगम लि.या केंद्रीय कंपनी मध्ये संपूर्ण भारतामधून महाराष्ट्रातील या कोपरगांव शहरातील नागरिकास बहुमान मिळून संचालकपदी झालेली निवड निश्चित कौतुकास पात्र आहे यावेळी सत्कारास उत्तर देताना अॅड.रविंद्र बोरावके यांनी भारत संचार निगम लि.या केंद्रीय कंपनीमध्ये पंतप्रधान कार्यालयातून शिफारस होऊन मा.राष्ट्रपती यांनी सदरची निवड केली असून त्यांनी जो विश्वास माझेवर टाकला आहे तो निश्चितच पूर्ण करेल तसेच बीएसएनएल चे टेलिफोन आता पुन्हा घराघरात वाजणार याचे कारण बीएसएनएल सेवा आता सॅटेलाईट मार्फत जोडले जाणार असून फायबर केबालची जरुरी आता राहणार नाही तसेच आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले पक्षाने माझे कार्याचा विचार करून माझेवर श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पूज्य साईबाबांच्या कृपेने सदरची जबाबदारी मी निश्चितच आपल्या सर्वांचे सहकार्याने प्रगतीकडे नेईल तसेच कोपरगांव चे विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
बँकेच्या उपाध्यक्ष सौ.प्रतिभाताई शिलेदार यांनी आभार मानले.संचालक डॉ.विजय कोठारी, सुनील कंगले,धरमचंद बागरेचा,कल्पेश शहा, सुनील बंब,यशवंत आबनावे, हेमंत बोरावके, रविंद्र ठोळे, सेवक संचालक विरेश पैठणकर, अशोक पापडीवाल,जनरल मॅनेजर दीपक एकबोटे, असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड, विठ्ठल रोठे, सुनील बोरा, कैलास खैरे, सुनील शिलेदार व सर्व सेवकवर्ग उपस्थित होते..
