सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मोरे यांनी केला पत्रकारांचा सन्मान..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:–
कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक अर्जुन रघुनाथ मोरे वडापाव विक्रेते यांच्यावतीने ६ जानेवारी पत्रकार दिना निमित्ताने पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला आहे.समाजसेवक अर्जुन मोरे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन पत्रकार बांधव नेहमी जनतेच्या हितासाठी लेखणी झिजवत असतो.सामान्य जनतेला न्याय मिळावा या उद्देशाने पत्रकार काम करत असतो.६ जानेवारी देशभरात पत्रकार दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.पत्रकार बांधवांचा सन्मान करुन पत्रकरांचा सत्कार अर्जुन मोरे यांनी केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *