
कोपरगाव प्रतिनिधी:-
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.
शिर्डीचे भूमिपुत्र व पारख कुटुंबाचीची शान, एक सच्चे समाजसेवक श्रीमान शशिकांतजी पारख हे नाशिक येथील श्री जैन ओसवाल बोर्डींग नाशिक या संस्थेवर प्रचंड मतांनी विजयी झाले तसेच त्यांचे सर्व पॅनल देखील निवडून आले. ज्या जैन बोर्डिंग मध्ये राहून शशिभाऊंनी शिक्षण घेतले त्याच संस्थेत काम करून निवडणूक लढवून पूर्ण पॅनल सह विजय त्यांना मिळाला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर हे संस्था म्हणजे माझी आई आहे असं ते नेहमी सांगतात. आज या बोर्डिंग मध्ये ५५० विद्यार्थी राहतात आणि फाईव्ह स्टार सुविधा त्यांच्यासाठी संस्थेने कमीतकमी दरात दिल्या त्यामुळेच आज या विद्यार्थ्यांचे व पालकांचे आशीर्वाद शशिभाऊंना मिळता आहेत. सर्वांना एकत्र धरून काम करणे, मोठ्या, जेष्ठ व्यक्तींचा आदर करणे हा शशिभाऊंचा गुण लहानपणापासून आम्ही पहिला. त्याच गुणांच्या जोरावर याच बोर्डिंग मधेच नाही तर ना.म.को हॉस्पिटल मध्ये देखील भाऊंची गोरगरीब रुग्णांची सेवा नेहमी चालू असते हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आमचे नातेवाईक आजारी असताना शशिकांत भाऊंनी खूप मदत केली भाऊंना या निवडणुकीत सगळ्यात जास्त मत भेटले हा साई बाबाचा आशीर्वाद आहे आणि यापुढे भाऊंच्या हातुन असेच सत्कर्म घडो गरीब दिन दुबळ्या लोकांची व विद्यार्थ्यांची सेवा घडो हीच साई चरणी प्रार्थना.
