
कोपरगाव प्रतिनिधी:- डॉ. घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कोविड पश्चात आजारांसंदर्भात आरोग्य शिबिराचे उदघाटन दि.१६ ऑगस्ट रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.


या शिबिरामध्ये कोविडमधून बरे झाल्यानंतर रुग्णांना होणाऱ्या म्युकरमायकोसिस, हृदयरोग, किडनीचे आजार, मानसिक आजार, ताण – तणाव, अशक्तपणा आदी आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरूणजी चंद्रे, पंचायत समिती सदस्य अनिलजी कदम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्तजी सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, राजेंद्रजी वाकचौरे, फकीरमामु कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, डॉ. दीपक पगारे, डॉ. राजेंद्र वाघडकर, डॉ. कुणालजी घायतडकर, डॉ. भाग्यश्री घायतडकर आदी उपस्थित होते.
