पुणतांब्यात दत्त जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी:- पत्रकार किरण नाईक…

कोपरगाव

पुणतांबे प्रतिनिधी:-
येथील थोरात गल्लीतील, सांबारे यांच्या दत्त मदीरात दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली. भजन, दत्त जल्म. महाआरती. आदी धार्मीक कार्यक्रम पार पडले. भाविकांनी संध्याकाळी मंदीरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

दत्त जन्म दिनानिमीत्त मुर्तीला महाअभिषेक घालन्यात आला. शरद गोर्हे. यांनी पुजा सांगितली दत्त जन्माच्या वेळी विठ्ठल मंदीर भजनी मंडळींनी तासभर भजन केले. दत्त जन्माचा पाळना म्हटला, दिगंबरा दिगंबरा च्या मंत्रधोषात परिसर गजबजला होता. थोरात गल्ली मित्र मंडळाने भाविकांना प्रसाद म्हणुन साबुदाना खिचडी दिली. तर काहींनी केळांचे वाटप केले. दत्त जल्माच्या वेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गणेश पगार, कुंदलके, शाम कनशे, भोला उदावंत, राजेंद्र काबरास आंदीचे मोठे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *