
कोपरगाव प्रतिनिधी:- संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त श्रीरामपूर येथील शब्दगंध साहित्यिक परिषद लोकरंग बहुउद्देशीय संस्था वडाळा महादेव करिअर काॅमपुटर यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत व्यक्तींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते जेष्ठ साहित्यिक आमदार लहू कानडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व लक्ष्मण राव निकम यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे
मा कडूभाऊ काळे डॉ रविंद्र कुटे सुनील गोसावी वंदनाताई मुरकुटे शर्मीलाताई गोसावी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत
शेख मिराबक्ष बागवान शेख रफीक आनंदा साळवे यांनी पुरस्कार जाहीर केले आहेत जिल्ह्यातील अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा समावेश आहे
छायाचित्रकार/ साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी आजतागायत राबविलेल्या उपक्रमांची दखल घेऊन पुरस्कार जाहीर झाला आहे
पुरस्कार मिळाल्याबद्दल कोपरगाव साहित्यिक मंडळ व अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत
