राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कोपरगाव शहराच्या विकासाचे व्हिजन:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- २०१६ ला कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक झाल्यापासून पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरविकासाला प्राधान्य दिले आहे. शहरातील जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विश्वास दाखवून माझ्यावर शहराच्या विकासाची जबाबदारी सोपविली असल्यामुळे दोनच वर्षात शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. भविष्यात देखील निधीचा ओघ असाच सुरु राहणार असून येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता द्या. तुमच्या विकासाच्या सर्व अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच पूर्ण करू शकतो कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कोपरगाव शहराच्या विकासाचे व्हिजन आहे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे केले.

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये आसिफ शेख, इमरान बागवान या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५ नं. साठवण तलावाच्या १२० कोटीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी आणली आहे. कोपरगाव नगरपरिषदेला १२ कोटी निधी दिला आहे, धारणगाव रस्त्यांसाठी २ कोटी तसेच इतरही रस्त्यांसाठी निधी दिला आहे. न्यायालयाच्या नूतन इमारतीसाठी ३८.६३ कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाला २८.८४ कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दोनच वर्षात कोपरगाव शहरात कोट्यावधीची कामे मंजूर करण्यात यश मिळाले आहे. यापुढील काळातही विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, फकीर कुरेशी, कार्तिक सरदार, जावेद शेख, सचिन परदेशी, प्रकाश दुशिंग, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, सलीम पठाण, ऋषिकेश खैरनार, वाल्मिक लहिरे, संदीप देवळालीकर, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, मुकुंद इंगळे, प्रसाद उदावंत, एकनाथ गंगूले, आकाश डागा, राजेंद्र जोशी, इम्तियाज अत्तार, सागर लकारे, विजय त्रिभुवन, महेश उदावंत, विकि जोशी, मनोज नरोडे, फिरोज खान, ऋषिकेश काळे, गणेश बोरुडे, योगेश नरोडे, राजेंद्र ठाकरे, फिरोज पठाण, बाळासाहेब शिंदे, रहेमान कुरेशी, रफिक शेख, चांदभाई पठाण, मनोज शिंदे, राजेंद्र उशीरे, जाफर कुरेशी, संजय दुशिंग, अय्युब कच्छी, सचिन पगारे, रोहित खडांगळे, विशाल कोपरे, नितीन शिंदे, मेहराज पठाण, योगेश वाणी, जगन कांबळे, शाहरुख कुरेशी, संतोष बारसे, फकीर बागवान, अकील शेख, वसीम शेख, शंकर अढांगळे, विशाल सासोटे, सोफियान खाटीक, रफिक बागवान, नासेर बागवान आदींसह नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळ:- कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन प्रसंगी बोलतांना आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *