

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नगरपालीका, जिल्हा परिषद ,पंचायत समिति, ग्रामपंचायतं,आगामी निवडणुकीची पुर्व तयारी म्हणुन कोपरगाव विधानसभा नवनियुक्त संर्पकप्रमुख उदयजी दळवी यांनी कोपरगाव मतदार संघातील परिस्थिती जाणुन घेण्यासाठी शिवसेनेच्या विविध विभागाच्या बैठका दि.९ डिसेंबर व १० डिसेंबर या दोन दिवसात बैठका घेवुन त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघात शिवसेनेची मोठी फळी असुन येणार्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा उदयजी दळवी यांनी घेतला आहे.कोपरगाव येथे शिवालयात विविध विभागाच्या पदाधिकार्यांच्या बैठका नुकत्याच संपन्न झाल्या आहे.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष उत्तर अहमदनगर जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र झावरे, कोपरगाव विधानसभा संघटक आश्रम शेख यांनी उदयजी दळवी यांचे स्वागत करुन सत्कार केला आहे.पहिल्या दिवशी उपशहर प्रमुख,संघटक, समन्वयक यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला बाळासाहेब सांळुके,नितिन राऊत,उपशहरप्रमुख विकास शर्मा,भुषण पाटणकर ,गगन हाडा,प्रफुल्ल शिंगाडे,गोपाल वैरागळ यांच्या उपस्थित बैठक पार पडली.त्यानंतर १४ प्रभागाचे विभाग प्रमुख यांची बैठक पार पडली.तिसरी बैठक युवती सेना व महिला आघाडीची बैठक झाली.या बैठकीला उपजिल्हाप्रमुख सपनाताई मोरे,शहरप्रमुख राखीताई विसपुते,उपशहरप्रमुख अश्विनीताई होने,अमृता राऊत शितल चव्हाण आरती कौर उपस्थित होत्या.चौथी बैठक एस.टी. कामगार सेना व शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकारी यांची बैठक कोपरगाव विधानसभा संघटक अस्लमशेख एस.टी. कामगार सेनेचे कोपरगाव शहरप्रमुख भरत मोरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली अशा पद्धतीने सर्व विभागाच्या पदाधिकारी यांच्या समस्या जाणुन घेवुन अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.याप्रसंगी शिव वाहतुक सेनेच्या शाखेचे साई काँर्नर या ठिकाणी उदघाटन उदयजी दळवी, राजेंद्र झावरे,शिव वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर कोपरगावला धार्मिक महत्व असलेले तपोभूमी,दैत्यगुरु शुक्राचार्य तसेच शिर्डी येथे साईबाबा मंदिराला कोपरगाव शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या उपस्थितीत दर्शन घेवुन भेटी देण्यात आल्या आहे.शहरातील बेट भागातील निष्ठावंत शिवसैनिक वायखिंडे यांचा दशक्रीया विधी येथे उपस्थित राहून त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभाग नोदवला आहे.कोपरगावात शिवसेनेच्या बळावर संत ज्ञानेश्वर स्कृल राजेंद्र झावरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे.या शाळेलाही भेट दिली असुन शाळेच्या कर्मचारी यांनी उदय दळवी यांचा सत्कार केला आहे.यानंतर दुसर्या दिवशी विरा पँलेस येथे शिवसेनेच्या सर्व विभागाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची तालुका बैठक घेण्यात आली. ही बैठक माजी नगराध्यक्ष जिल्हाप्रमुख राजेद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे माजी तालुका प्रमुख बाळासाहेब जाधव, श्रीरंग चांदगुडे, एस.टी कामगार सेेेनेचे कोपरगाव शहरप्रमुख भरत मोरे, शहरप्रमुख कलविंदर सिंग दडियाल,बाबासाहेब बढे,कार्यध्यक्ष रावसाहेब थोरात अशोक कानडे यांच्या उपस्थितीत संंपन्न झाली.या बैठकीत दळवी यांनी मार्गदर्शन केले असुन पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी मतभेद विसरून काम करावे.हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नविन पिढीला समजावून देवून त्यांना सामाजिक कार्यात सहभागी करावे.तसेच उध्दवसाहेब ठाकरे यांचे कार्य जनतेपर्यत पोहचवावे गाव तेथे शिवसैनिक घर टु घर शिवसैनिक अभियान राबवून शिवसेना मोठी करण्यासाठी झटले पाहिजे. आमामी निवडणुकीत शिवसैनिक सदस्य जास्तीत जास्त कसे निवडुन आणता येईल या साठी विचार करून प्रयत्न केले पाहिजे या करता मी संपर्कप्रमुख या नात्याने आपल्या भावना वरीष्ठाकडे पोहचवुन निश्चित तुमचे पाठीशी भक्कम पणे उभा राहिल अशी ग्यावी देतो असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा संपर्क प्रमुख उदय दळवी यांनी केले आहे.शिवसेनेच्या दुसर्या गटाच्या पदाधिकारी यांच्या भेटी देेेेखील दळवी यांनी घेतल्या असुन वरिष्ठांना कोपरगाव तालुक्याचा अहवाल सोपविला जाणार आहे.या बैैैठकीला शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
