
कोपरगाव प्रतिनिधी:-
डिजिटल इंडियाची क्रांती करून भारत देशात कोरोना उपचाराची लस तयार करून त्याचे संपूर्ण जगाला वितरित करणारे व गरीब घटकांच्या उन्नतीसाठी देशाचे पंतप्रधान म्हणून असंख्य विकासाच्या योजना राबवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचे राष्ट्रभक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व कोपरगाव शहर, तालुका भाजप, संजिवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कलश मंगल कार्यालयात महारक्तदान शिबिर घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे वैभवात भर घालणाऱ्या नगरपालिका, वाचनालय, पोलीस ठाणे अग्निशामन इमारती, बाजारओटे, ४२ कोटीची पाणी योजना आदि विकासात्मक ठिकाणी शुक्रवारी विवेक कोल्हे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, गटनेते रवींद्र पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी प्रास्ताविकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक कार्याचा आलेख सांगितला.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, विजय वाजे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, विजय आढाव, पराग संधान, सिद्धार्थ साठे, बाळासाहेब पानगव्हाणे, विवेक सोनवणे, बाळासाहेब नरोडे, वैशाली आढाव, विनोद राक्षे, दिपक चौधरी, वैभव गिरमे, रवी रोहमारे, कैलास धट, नवनाथ गोरख, अल्ताफ कुरेशी, इलियास खाटीक, नंदाताई भुसे, भिमराव भुसे, संजीवनी ब्लड बँकेच्या संचालिका डॉ. नीता पाटील, डॉ. नानासाहेब शिंदे, भीमा संवत्सरकर, वासू शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संजीवनी उद्योग समूहाचे आजी-माजी संचालक उपस्थित होते.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने राष्ट्राचा विचार करून त्याच्या प्रगतीसाठी जिवाचे रान करत तळागाळातील उपेक्षित घटकांचा विकास करण्यासाठी त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून असंख्य जनकल्याणाच्या योजना साकारल्या आहेत. कोविड महामारीत भारतीय शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देत लस विकसित करत त्याचे जगभर वितरण केले ही एकविसाव्या शतकातील मोठी नांदी आहे. भारताला महासत्ता बनण्यासाठी त्यांचा दृष्टिकोन सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी गत पाच वर्षाच्या कालखंडात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा करत नव्याने शासकीय इमारती उभारल्या त्याची आठवण सतत व्हावी यासाठी मोदींच्या वाढदिवसानिमित्त येथे वृक्षारोपणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ते शेवटी म्हणाले. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी आभार मानले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील८९ गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षiरोपण अभियान राबवण्यात आले.


फोटो ओळी :- कोपरगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व कोपरगाव शहर, तालुका भाजप, संजिवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कलश मंगल कार्यालयात जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत महा रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करण्यात आले.
