दि.20 नोव्हेंबर रोजी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने उक्कडगांव येथे बैठक संपन्न:-विजय जाधव…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने मा.आ.नाना पटोले साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,मा ना बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब साळुंखे साहेब यांच्या सुचेनेनुसार श्री नितीनराव शिंदे तालुकाध्यक्ष कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने श्री भरत बाबुराव कराळे
विश्वनाथ पवार,पंढरीनाथ रामभाऊ खिलारी,उतमराव येडु त्रीभुवन,गंगाधर किसन राउत,विलास रामभाउ गव्हाळे,बाजीराव रामनाथ सोनवणे यांना उक्कडगांव येथे ज्ञानेश्वर पाटील भगत तालुकाध्यक्ष राष्ट्र सेवा दल किसान सेल तालुकाध्यक्ष विजयराव जाधव व रमेशराव गागरे, राहाता तालुकाध्यक्ष राष्ट्र सेवा दल यांचा उपस्थिती विविध पद नियुक्ती पत्र देण्यात आले. दि 20 नोव्हेंबर रोजी उक्कडगांव येथील बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षाची रणनीती व धोरण आणि कार्यकर्ता मार्गदर्शन हे या बैठकीचे प्रमुख उद्देश होते. काँग्रेस पक्ष कोपरगाव मध्ये येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व मार्केट कमिटी निवडणुका पूर्ण ताकदीने सर्व जागा लढवण्याच्या तयारीत आहे व आगामी काळात असंख्य तरुणांना संधी देऊन काँग्रेस पक्षाला प्रबळ करण्याचा निर्धार आहे. ह्या बैठकीला बहुसंख्य स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *