
संजीवनच्या दर्जा व गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब…
कोपरगांव प्रतिनिधी:- हायलाईटस् या इंग्रजी मासिकाने ओबीई रॅन्कींग २०२१ या उपक्रमांतर्गत घेतलेल्या देश पातळीवरील सर्वेक्षणात संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजला अकॅडमिक एक्सलंस वर्गवारीत ४० वा रॅन्क मिळाला असुन यामुळे संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या दर्जा व गुणवत्तेवर पुन्हा शिक्का मोर्तब झाले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर व प्रा. शैलेश पालेकर यांनी हायलाईटस् मॅगेझिनने प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार सर्व माहिती पुराव्यांसहित ऑनलाईन भरली. यात प्रामुख्याने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालेला ऑटोनॉमस (स्वायत्त) संस्थेचा दर्जा, आवुटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई-परीणाम/निष्पत्ती आधारत शिक्षण ), अध्यापन-अध्ययन (टिचिंग -लर्निंग) पध्दतीमधिल आधुनिकता व नाविण्यता, समावेश आणि विविधता, औद्योगीक प्रशिक्षण आणि संस्थेच्या माध्यमातुन अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या , उद्योजकता आणि नवकल्पना या बाबींवर भर देण्यात आला होता. यात परीक्षकांनी संस्थेत असलेला पी.एच.डी. शिक्षित प्राद्यापक वर्ग, प्रयोगशाळा व वर्ग खोल्यांमधिल सादरीकरणासाठी आधुनिक उपकरणे, कॅम्पसमधिल इंटरनेट व वायफाय सुविधा, डीजीटल क्लासरूम्स, संस्थेस मिळालेले राज्य व देश पातळीवरील विविध पुरस्कार, विध्यार्थ्यांना मिळत असलेले तांत्रिक, खेळ, सांस्कृतिक व इतरही क्षेत्रातील दैदिप्यमान यश , ग्रीन अँड स्मार्ट कॅम्पस, सौर उर्जा प्रकल्प, आदि बाबींची शहानिशा करून देश पातळीवर संजीवनीला ४० वा रॅन्क दिला. यात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संजीवनी एकमेव आहे तर महाराष्ट्रातील फार थोड्या महाविद्यालयांचा समावेश आहे.
माजी मंत्री व संजीवनी गुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.
