पाणी दारणातून द्या, निळवंडेतून द्या कोठूनही द्या कोपरगाकरांना दररोज , स्वच्छ , नियमित पाणी द्या :- राजेश मंटाला…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-पाणी दारणातून द्या, निळवंडेतून द्या कोठूनही द्या ….
कोपरगाकरांना दररोज , स्वच्छ , नियमित पाणी द्या ….राजेश मंटाला ,
काल कोपरगांव शहराच्या पाणीप्रश्नाबाबत पत्रकार परिषद घेतली . प्रास्ताविक श्री. संतोषभाऊ गंगवाल ,
श्री. तुषारजी विध्वंस यांनी केले .
आपणा सर्वांना माहिती असेलच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नगरविकास मंत्रालयाचचे अधिकारी , मुख्याधिकारी गोसावी साहेब व माझी ऑनलाईन मिटिंग झाली होती . त्यावेळेस शहराच्या पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवणेबाबत सविस्तर चर्चा झाली . या आगोदरही मुख्याधिकारी सरोदे साहेब यांच्यासमवेत अशीच मिटिंग झाली होती .
नगरविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी साहेब यांना दोन अधिकृत कागदपत्रे सादर करण्यास सांगीतले होते ज्यामुळे त्यांना कोपरगांव शहराच्या पाणी
योजणेवर तत्काळ काम सुरु करता येईल.
ते कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत
१ ~ कोपरगांव शहराच्या नविन पाणीयोजनेसाठी जो प्रस्ताव जिवन प्राधिकरणकडे तांत्रिक मंजुरीसाठी दिला आहे .सादर केल्याची अधिकृत प्रत ….
२ ~ वाढीव पाणी मागणीसाठी जे जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे त्याची अधिकृत प्रत …
परंतु मुख्याधिकारी साहेब यांनी अद्यापही कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नगरविकास मंत्रालयास सादर केलेली नाही .
गेल्या अनेक दिवसापासुन त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून विचारणा करत आहे की कागदपत्रे पाठवली का तर ते आज , उद्या पाठवतो असे म्हणून टाळाटाळ करत आहेत .
यासंदर्भात मी , संतोषजी गंगवाल, तुषार विध्वंस, निसारभाई शेख तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसमवेत प्रत्यक्ष नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्षांच्या दालनात मुख्याधिकारी , नगराध्यक्ष व पाणी पुरवठाच्या अधिकारी पाटील मॅडम यांच्या समवेत बैठक घेतली . त्यावेळेसही त्यांनी सांगीतले उद्या लगेच सर्व कागदपत्रे पाठवतो . तरीही त्यांनी ते पाठवले नाहीत .
योगायोगाने बैठक घेतल्याच्या दुसच्याच दिवशी कोपरगांव शहराच्या पाणीयोजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली .
मला याबाबत स्वतः आमदार श्री . आशुतोष काळे साहेब यांनी फोन करून ही आनंदाची बातमी कळवली . मी त्यांचे तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी साहेब यांचे अभिनंदन केले .
कारण हेच कागदपत्रे नगरविकास मंत्रालयाच्या अधिकार्यांनी मागितले होते .
परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे . पंधरा दिवस उलटुन गेले तरी अद्यापही मुख्याधिकारी यांनी हि कागदपत्रे नगरविकास मंत्रालयास पाठवली नाही.

  • माझा मुळ मुद्दा हाच आहे कि नगरविकास मंत्रालयास केंद्र सरकाच्या निर्देशानुसार आपला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा आहे त्याबाबत त्यांनी ज्या सुचना मुख्याधिकारी साहेबांना केल्या आहेत तर कागदपत्रे का पाठवली जात नाहीत ?
    यांच्यावर कुणाचा दबाव आहे का ? *
    जर वेळेत तत्परता दाखवून कागदपत्रे पाठवली असती तर त्यावर कामसुद्धा पुर्ण झाले असते .
    काही मुद्दे शहराच्या पाणीयोजणेला मिळालेल्या तांत्रिक मंजुरी बाबत …
    सर्व प्रथम हे समजुन घेण्याची गरज आहे की तांत्रिक मंजुरी म्हणजे नगरपालिकेने पाचवे तळे नव्याने तयार करने व पुर्वीच्या तळ्यांची दुरुस्ती करने, दररोज पाणी मिळावे याकरीता वितरण व्यवस्थेसाठी आराखडा तयार केला आहे .त्या आराखड्याला MJP कडून मंजुरी घेणे .
    त्यानंतर ते नगरविकास मंत्रालयास सादर होईल मग ते त्यावर कार्य करतील आणी प्रशासकिय मंजुरी मिळेल मग निधि मंजुरी नंतर टेंडर प्रक्रिया होऊन नंतर प्रत्यक्षात कार्यास सुरवात .
    तांत्रिक मंजुरीचे कागदपत्रे बघीतली तर त्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आपणांस निळवंडे ची योजणा सोडून द्यावी लागेल .
    याबाबत माझे स्पष्ट मत हे आहे की जर ज्या निळवंडेच्या योजनेत आपल्या सोबत जे शिर्डी आहे त्यांना ही दोन योजनेची अट नाही . संगमनेर येथे दोन पाणीयोजना आहेत मग आपल्यालाच निळवंडेवरील हक्क का सोडण्यास सांगितले जात आहे .
    नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब हे धुळ्याहुन बदलून कोपरगांवला आले आहेत . एकदा चर्चेदरम्यान त्यांनीच मला सांगीतले होते कि धुळ्यात तिन योजनेचे पाणी मिळते . आपल्यालाही दोन्ही योजणेचे पाणी मिळू शकते .
    माझा मुद्दा इतकाच आणी स्पष्ट आहे की निळवंडेच्या नावाखाली चार ते पाच वर्षे निघून गेली . आता सत्ता बदलली योजना रद्द ची अट , जर १२० कोटींची योजना नव्याने तयार होऊन मंजुरी मिळाली आणी पुन्हा दोन वर्षांनी सरकार बदलले तर पुन्हा योजणा बदलनार का ?
    म्हणजे आधीच पंचविस वर्षांपासूनची ही समस्या आहे जर असच चालले तर आपणांस आणखी किती वर्ष वाट बघावी लागेल .
    दोन्ही नेते एकत्र बसुन निर्णय का घेत नाहीत ?
    १२० कोटींची योजना मंजुर करण्यासाठी जी निळवंडेची योजना रह करण्याची अट घातली आहे त्याचा ठराव नगरपालिकेने मंजुर केला आहे का आणी त्यास मुख्याधिकारी , नगराध्यक्ष , सर्व नगरसेवक यांची मंजुरी आहे का ?
    मित्रांनो १२० कोटींची योजणा ही झालीच पाहीजे कारण पाणी कोठुनही आले तर साठवण क्षमता आणी सक्षम वितरण व्यवस्था ही हवीच. आजमितीला हे कार्य महत्वाचे आहे .
    त्यामुळे तांत्रिक मंजुरीचे कागदपत्रे , तसेच वाढीव पाणीयोजणेची कागदपत्रे नगरविकास मंत्रालयास मुख्याधिकारी साहेब यांनी त्वरित पाठवावीत आणी ते पाठवतील अशी अपेक्षा करू तसेच निळवंडेचा हक्क सोडण्याची अट त्वरित मागे घ्यावी . याबाबत सर्वांनी एकत्र बसुन त्वरीत निर्णय घ्यावा ही विनंती .
    नाहीतर शहरातील सर्व नागरिकांना एक सामाजिक कार्य समजून एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल . अशी वेळ येऊ नये हिच अपेक्षा .
    या वेळी ॲड. नितिनजी पोळ ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितिनजी शिंदे ,शिवसेना शहरप्रमुख कलविंदरजी दडियाल , शिवसेनेचे तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख प्रविणजी शिंदे ,साकोला विधानसभा संपर्कप्रमुख मनोजजी कपोते , वंचित शहर आघाडीचे शरदभाऊ खरात , क्रांतीवीर लहुजी टायगर सेना संस्थापक शरदजी त्रिभुवण , सामाजीक कार्यकर्ते निसारभाई शेख , आनंदजी टिळेकर, छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद निकम , वास्तव ग्रुपचे सदस्य ,सुवर्णकार समाजाचे कृष्णाशेठ उदावंत, दिगंबर जैन समाजाचे पंच प्रविणजी गंगवाल, आतिशजी शिंदे , कोपरगांव इमारत बांधकाम कामगार संघटणेचे संस्थापक किशोरजी चोरगे , देशभक्ती सेवामंचचे अध्यक्ष रविभाऊ जगताप , प्रसिद्ध व्यापारी मुकुंदजी भुतडा ,राजेशजी लोंगाणी, दिपकजी घोडले , काशिनाथजी भावसार , सौ. सुनंदा भावसार तसेच इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते .
    ज्यांना त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा इतर काही कारणास्तव येऊ शकले नाही त्यांचेही खुप धन्यवाद …
    पत्रकार परिषदेस उपस्थित राहुन अनेकांनी पक्षविरहीत एक सामाजिक कार्य समजुन जो पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचे खुप खुप धन्यवाद …
    तसेच वृत्तपत्र , डिजिटल मिडीयाचे पत्रकार बंधु राजेंद्रजी सालकर, महेशजी जोशी, शंकरजी दुपारगुडे , मोबिनभाई हे उपस्थित राहील्याबद्दल धन्यवाद …..
    आपला नम्र :
    राजेश मंटाला
    सामजिक कार्यकर्ता
    कोपरगांव
    8793501122

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *