कोपरगांवच्या अवर्षणग्रस्तभागातील लाभार्थ्यांना विहीर योजनेचा लाभ आमदार काळेंमुळे नव्हे तर तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हेंच्या पाठपुराव्यामुळे यश:-कैलास रहाणे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील लाभार्थ्यांना विहीर योजनेचा लाभ आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे नव्हे तर भाजपाच्या प्रदेश सचिव व तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळेच मिळाला असुन त्यात नव्याने २१ गावांचा देखील समावेश त्यांच्यामुळेच झाला असल्याची माहिती कैलास रावण रहाणे यांनी दिली. तेव्हा याप्रकरणी आमदार काळे यांनी श्रेय घेण्यांचा केविलवाणा प्रयत्न करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.
श्री. कैलास रहाणे पुढे म्हणाले की, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांति योजना क्षेत्राबाहेरील व क्षेत्रांतर्गत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना २०२०. २१ अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नविन विहीरी घेण्यांसाठी फेर सर्वेक्षण करून जिरायत गावांचा व पाटपाणी न मिळणा-या लाभार्थ्यांचा समावेश व्हावा म्हणून संबंधीत विभागाचे मंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री व अहमदनगरच्या भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी यांच्याकडे १ जुलै रोजी विशेष पत्र देवुन पाठपुरावा केला होता.
यात यापुर्वी फक्त धोत्रे, भोजडे आणि तळेगांवमळे या तीनच गावांचा समावेश होता मात्र जिरायत भागातील लाभार्थी संख्या मोठी असुन त्यांना या योजनेपासुन कायम वंचित रहावे लागते याबाबतची तौलनिक माहिती संबंधीत विकास यंत्रणेला प्रत्यक्ष पटवुन दिली. कोपरगांव तालुक्यातील जिरायत व पाटपाणी न मिळणा-या गावातील लाभार्थ्यांना या योजनेतुन शासकीय अनुदानावर नव्याने विहीर घेता येणार नाही याची माहिती दिली.
सौ स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्याला यश आले असुन आता धोत्रे, भोजडे, तळेगांवमळे या तीन गावांसह अंजनापुर, बहादराबाद, बहादरपुर, चदिकसारे, डाउच खुर्द, देर्डे चांदवड, देर्डे को-हाळे, धोंडेवाडी, धोत्रे, घारी, जवळके, जेउरकुंभारी, खोपडी, मढी बुद्रुक, मढी खुर्द, मनेगांव, पोहेगांव बुद्रुक, पोहेगांव खुर्द, रांजणगांव देशमुख, शहापुर, सोनेवाडी, सोयेगांव या अवर्षणग्रस्त लाभार्थी शेतक-यांनाही लाभ मिळणार आहे त्याबददल जिरायती भागातील शेतक-यांनी सौ. कोल्हे यांना धन्यवाद दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *