आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे मित्रमंडळ व जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुलच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज चांदेकसारे येथे आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे मित्रमंडळ व जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुलच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी रक्तदानासारखा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सौ. चैतालीताई काळे यांनी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांचे तसेच जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुलच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुलचे भास्कर होन, सुनील होन, किरण होन, अशोक होन, आर.आर. होन, भीमराव होन, दुर्गानाना होन, अर्जुन होन, बाबासाहेब होन, शरद होन, राजेंद्र होन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *